आता घरपोच मिळवा 5G Sim Card, ते ही मोफत, जाणून घ्या
खरंच की काय फ्रि मध्ये देतायत 5G Sim, तुम्ही घेतलत का?
मुंबई : देशात 5G लाँच झाल्यापासून सर्वंत्र त्याचीच चर्चा आहे.या 5G लाँचनंतर आता अनेक कंपन्यांनी त्यांच्या त्यांच्या ग्राहकांपर्यंत 5G सेवा पुरवण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. त्यात आता या कंपनीने मोफत 5G सिम देण्याचा निर्णय घेतला, तो ही मोफत, त्यामुळे या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जर तुम्ही Jio धारक आहात, तर तुम्हाला आता घरपोच 5G सिम मिळणार आहे. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही.मोफत तुम्हाला हा सिम घरपोच मिळेल. Jio कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी मोफत सिम कार्ड (Sim card) होम डिलिव्हरी ऑफर सुरू केली आहे. या ऑफरमध्ये तुम्ही ऑनलाइन सिम कार्ड निवडू शकता आणि ते तुमच्या घरी मागवू शकता.
तुम्हाला तुमच्या घरी सिम कार्ड (Sim card) मिळवण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तुम्ही तुमचा स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरून ते करू शकता. यासाठी फक्त काही मिनिटे लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याची सीम घरपोच मागवण्याच्या सोप्या स्टेप्स.
सोप्या स्टेप्स काय?
- सिम कार्ड (Sim card) मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम जिओच्या वेबसाइटवर जावे लागेल.
- वेबसाइटवर जाताच तुम्हाला गेट जिओ सिमचा पर्याय दिसेल.
- त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे नाव आणि नंबर टाकावा लागेल.
- त्यानंतर आपण या प्रक्रियेसह पुढे जाऊ शकता.
- आता तुम्हाला पोस्टपेड किंवा प्रीपेड सिम निवडावे लागेल.
- आता तुम्हाला तुमचा पत्ता टाकावा लागेल.
- यानंतर तुमचे सिम तुमच्या घरी पोहोचवले जाईल.
हे सिम (Sim card) तुमच्या हातात आल्यावर तुम्ही देखील 5G धारक होणार आहे. त्यामुळे आताच हे सिम मागवून 5G धारक व्हा.