Gadgets News : कोरोना संकटात लॉकडाऊनच्या काळात कामाची नवीन पद्धत समोर आली. वर्क फ्रॉम होम हे नवीन वर्क मॉडेल अजूनही अनेक क्षेत्रात राबवलं जातं आहे. या नवीन वर्क मॉडेलमध्ये आपली साथ देतो तो म्हणजे लॅपटॉप. ऑफिसचं काम असो किंवा पर्सनल काम हे ऑनलाईन करण्यासाठी आपण लॅपटॉपचा वापर करतो. गेल्या दोन वर्षांमध्ये लॅपटॉप वापरण्याचे प्रमाण वाढले आहेत. या लॅपटॉपचा जीव म्हणजे बॅटरी. बॅटरी संपली की तुमचा लॅपटॉप प्राण सोडतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या पण लॅपटॉपची बॅटरी वरच्यावर संपते. त्यात तुम्ही लोडशॅडिंगवाल्या परिसरात राहता, मग अशावेळी लाईट गेल्यावर तुमच्या लॅपटॉपची बॅटरी संपते. यामुळे तुमचं कामही थांब. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या लॅपटॉपच्या बॅटरीचं लाइफ वाढेल. 


1. ओरिजनल चार्जर वापरा


कायम लॅपटॉप असो किंवा मोबाईल यांच्या बॅटरीचं लाइफ वाढवायचं असेल तर ओरिजनल चार्जर वापरा. कारण कुठल्याही इलेक्ट्रॉनिक डिवाइससाठी ओरिजिनल चार्जर खूप महत्त्वाचं असतं. 


2. बॅटरी सेव्हर वापरा


लॅपटॉप वापरताना कायम बॅटरी सेव्हर हे ऑप्शन निवडा. त्यामुळे तुमच्या लॅपटॉपची बॅटरी वाचते. हा ऑप्शन निवडल्यावर तुमच्या लॅपटॉपमधील जास्त बॅटरी खर्च करणाऱ्या काही गोष्टी या तात्पुरत्या बंद होती. 


3. एक्टिव परफॉर्मेंससाठी कमी ड्यूरेशनची निवड करा


यामुळे लॅपटॉपची बॅटरी लाइफ वाढते. तसंच स्क्रीन टाइम पण बऱ्याच प्रमाणात कमी होतं. यासाठी तुम्ही Start वर जा आणि नंतर Settingsमध्ये जा. यानंतर सिस्टमवर जाऊन पॉवर आणि बॅटरीची निवड करा. पुढे स्क्रीन आणि स्लीपचा पर्याय निवडा. ऑन बॅटरी पॉवर चालू करण्यासाठी turn off my screen करा. 


4.  लॅपटॉपचा ब्राइटनेस कमी ठेवा


लॅपटॉपचा ब्राइटनेस कमीत कमी ठेवा. यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढतं मात्र हे करताना तुमच्या डोळ्यांवर ताण पडणार नाही, याची खबरदारी घ्या. 


5. स्क्रीन रिफ्रेश दर कमी करा


स्क्रीन रिफ्रेश हा तुमच्या डिव्हाइसचं परफॉर्मेंस चांगलं करतं. मात्र यामुळे तुमच्या लॅपटॉपची बॅटरी जास्त खर्च होते. 


6. ब्लू-टूथ किंवा WiFi बंद करा


गरज नसेल तर ब्लू-टूथ किंवा WiFi चा वापर केल्यानंतर बंद कार. कारण या फीचर्समुळे मोठ्या प्रमाणात बॅटरीचं आयुष्य कमी होतं.