न्यूयॉर्क : अमेरिकेतील मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या कंपनीतील अनेकांच्या नोकरीवर कुऱ्हाड आली आहे. कार कंपनी जनरल मोटर्स (General Motors) आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करणार आहे.


हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांवर नोकरीची कुऱ्हाड


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेडान कारची मागणी घसरत असल्याने त्याचं उत्पादन कमी करण्यात येण्याचं जनरल मोटर्सतर्फे सांगण्यात आलं. यामुळे अमेरिकेतील तब्बल एक हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागणार आहे.


कर्मचारी कपातीचा सर्वात मोठा फटका ओहियो येथील लॉर्ड्सटाऊन कारखान्यावर पडणार आहे. याच कारखान्यात शेवरलेट क्रूजचं उत्पादन केलं जातं. क्रूज गाडीच्या विक्रीत गेल्या चार वर्षांमध्ये तब्बल ३२ टक्क्यांनी घट झाली आहे. जनरल मोटर्सच्या प्रवक्तांनी एका ई-मेल मध्ये म्हटलं आहे की, "ओहियो कारखान्यात जवळपास ३,००० कर्मचारी काम करतात, या ठिकाणी दोन शिफ्टमध्ये काम होतं."


१,५०० नोकऱ्यांवर येणार गदा


कंपनीतर्फे सांगण्यात आलं आहे की, सेकंड शिफ्टचं उत्पादन २०१८ मधील दुसऱ्या तिमाहीत बंद करण्या येणार आहे. या निर्णयामुळे जवळपास १,५०० नोकऱ्यांवर गदा येणार आहे. जनरल मोटर्सचा हा प्लान्ट ६२ लाख स्क्वेअर फुट परिसरात आहे. या ठिकाणी १९९६ पासून दरवर्षी १.६ कोटी वाहनांचं उत्पादन केलं जातं.


गेल्यावर्षी तिसऱ्या शिफ्टचं काम केलं बंद


कंपनीने गेल्या वर्षी या प्लांटमध्ये सुरु असलेलं तिसऱ्या शिफ्टचं काम बंद केलं होतं. जनरल मोटर्सच्या मते, ही घोषणा केल्यानंतरही अमेरिकेत तितक्याच प्रमाणात क्रूड सेडान विक्री होण्याची अपेक्षा आहे जितकी गेल्या वर्षी होत होती. कंपनीने गेल्यावर्षी १,५०,००० क्रूजची विक्री केली होती.