Paytmचं दिवाळी गिफ्ट, iPhone8वर १५ हजारांचा कॅशबॅक
दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या ई कॉमर्स वेबसाईट बंपर ऑफर घेऊन आल्या आहेत.
मुंबई : दिवाळीनिमित्त वेगवेगळ्या ई कॉमर्स वेबसाईट बंपर ऑफर घेऊन आल्या आहेत. यामध्ये आता पेटीएमचीही भर पडली आहे. २९ सप्टेंबरला भारतात लॉन्च झालेल्या आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसवर पेटीएम कॅशबॅक देणार आहे. या दोन्ही मोबाईलवर ग्राहकांना १५ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. ही ऑफर १० ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबरपर्यंत सुरू असणार आहे.
ही कॅशबॅक ऑफर पेटीएम वॉलेट आणि अॅपवर मिळणार आहे. येस बँकचं क्रेडिट कार्ड असणाऱ्या ग्राहकांना आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसवर ग्राहकांना ६ हजार रुपये आणि पेटीएमकडून ९ हजार रुपये असे एकूण १५ हजार रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.
येस बँकेकडून मिळणारा ६ हजार रुपयांचा कॅशबॅक २० नोव्हेंबरपर्यंत पेटीएम वॉलेटमध्ये क्रेडिट होईल. तर शॉपिंग केल्यानंतर २४ तासांच्या आत उरलेले ९ हजार रुपये क्रेडिट होतील.
Paytm Mall चा महाकॅशबॅक ऑफर
'मेरा कॅशबॅक सेल'मधून एक कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या पेटीएमनं आता पेटीएम मॉलच्या माध्यमातून महाकॅशबॅक ऑफर आणली आहे. ही ऑफर १० ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबरपर्यंत सुरू असणार आहे. यामध्ये ग्राहकांना ७० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे.