रिलायन्स जिओची `ही` धमाकेदार ऑफर आज संपणार ...
रिलायंस जिओ बाजारात आल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये प्रचंड प्रमाणात प्राईज वॉर सुरू झाले आहे. स्वस्त दरात अधिकाधिक ऑफर्स उपलब्ध करून देण्यासाठी चढाओढ सुरू आहे.
मुंबई : रिलायंस जिओ बाजारात आल्यानंतर टेलिकॉम कंपन्यांमध्ये प्रचंड प्रमाणात प्राईज वॉर सुरू झाले आहे. स्वस्त दरात अधिकाधिक ऑफर्स उपलब्ध करून देण्यासाठी चढाओढ सुरू आहे.
100 % हून अधिक मिळणार कॅशबॅक
रिलायन्स जिओने काही दिवसांपूर्वी 'गेट मोअर दॅन 100% कॅशबॅक' ही ऑफर बाजारात आणली होती. यानुसार, 398 किंवा त्यापेक्षा अधिक रूपयांचा रिचार्ज केल्यास 700 रूपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे.
आज संपणार ऑफर
रिलायन्स जिओच्या या ऑफरला मुदत वाढ देण्यात आली होती. यानुसार 15 मार्च 2018 ही अंतिम तारीख आहे. आज या धमाकेदार ऑफरचा शेवटचा दिवस आहे.
700 रूपयांपर्यंतचा कॅशबॅक
रिलायन्स जिओच्या नव्या ऑफरनुसार, ग्राहकांनी 398 पेक्षा अधिक रूपयांचा प्लॅन रिचार्ज केल्यास 700 रूपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळणार आहे. ही कॅशबॅक ऑफर मिळवण्यासाठी ग्राहक प्राईम कस्टमर असणं आवश्यक आहे. ग्राहकांना 400 रूपयांचा कॅशबॅक आणि 300 रूपये डिजिटल वॉलेटमध्ये येणार आहे. ग्राहकांना मिळणार्या वाऊचर्सचा फायदा उठवण्यासाठी MYJIO हे अॅप डाऊनलोड करावे लागणार आहे.