नवी दिल्ली : महानगरपालिका असो किंवा विधानसभा निवडणुका सर्वात महत्त्वाचं मतदान कार्ड असणं महत्त्वाचं आहे. ते नसेल तर तुम्ही मतदान करू शकत नाही. अनेक राज्यांमध्ये निवडणुका जवळ आल्या आहेत. मतदार ओळखपत्र हे एक असं ओळखपत्र आहे, ज्याद्वारे एखादी व्यक्ती मतदान केंद्रावर जाऊन मतदान करू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुम्ही मतदान कार्ड घरबसल्या आपल्या फोनवर घेऊ शकता किंवा काढू देखील शकता. तुम्ही त्यासाठी घसबसल्या ऑनलाईन अर्ज देखील करू शकता. तुम्ही हे वोटर कार्ड कसं डाऊनलोड करू शकता याची नक्की प्रक्रिया काय आहे याबाबत जाणून घेऊया. 


E-EPIC Voter Card नेमकं काय आहे?
मतदान कार्डचं डिजिटल व्हर्जन E-EPIC Voter Card आहे. याला  इलेक्ट्रॉनिक इलेक्टोरल फोटो आयडेंटिटी कार्ड असंही म्हटलं जातं. ते PDF स्वरूपात निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलं आहे. ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचे संपादन करता येणार नाही. हे ई-ईपीआयसी मतदार कार्ड कार्ड केवळ मतदानासाठी पूर्णपणे वैध नाही तर ते फोटो आयडी म्हणूनही वापर करता येऊ शकतो.


यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा वेबसाईटवर जाऊन लॉगईन करावं लागणार आहे. यासाठी राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल म्हणजेच NVSP या वेबसाईटला भेट द्या. तिथे तुम्हाला e-EPIC Download चा पर्याय मिळेल, तो ओपन करा आणि पेज ओपन झाल्यावर रजिस्टर बटणावर क्लिक करा.


तिथे तुम्हाला KYC करावं लागणार आहे. तुमची सगळी माहिती अपलोड करा. मोबाईल फोनचा कॅमेरा उघडेल आणि तुम्हाला तुमचा चेहरा दाखवावा लागणार आहे. फेस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमची वैयक्तीक माहिती अपलोड करा. भरलेली माहिती योग्य आहे का? ते एकदा तपासा आणि सबमिट पर्याय निवडा. 


तुमच्या नंबरवर OTP येईल, तुम्ही तो अपडेट करताच तुमचे KYC आणि रजिस्ट्रेशन दोन्ही पूर्ण होईल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर, पुन्हा पहिल्या पेजवर जा आणि तुमचा आयडी आणि पासवर्ड अपलोड करून लॉगइन करा. तिथे तुम्हाला तुमचा EPIC क्रमांक किंवा फॉर्म संदर्भ क्रमांक विचारला जाईल. तो तिथे अपलोड करायचा आहे. 


तुम्हाला पुन्हा एकदा OTP येणार आहे. OTP आल्यानंतर तो अपलोड करा. त्यानंतर e-EPIC फाइल दिसेल, तिथे डाऊनलोड म्हणा. ते केल्यानंतर वोटर कार्ड तुमच्या फोनमध्ये डाऊनलोड होईल.