20 मेगापिक्सल सेल्फी कॅमे-यासोबत लाँच झाला जिओनीचा नवा फोन
जिओनी इंडिया मोबाईल कंपनीने आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने जिओनी ए1 लाईट फोन लाँच केला असून यामध्ये तब्बल 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि 4000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.
नवी दिल्ली : जिओनी इंडिया मोबाईल कंपनीने आपला नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने जिओनी ए1 लाईट फोन लाँच केला असून यामध्ये तब्बल 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि 4000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.
हे आहेत खास फिचर्स...
जिओनी ए1 लाईट हा फोन दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये गोल्ड आणि ब्लॅक या रंगांचा समावेश आहे. या फोनला 5.3 इंचाचा एचडी डिस्प्ले तसेच सुरक्षेसाठी 2.5 डी गोरिल्ला ग्लास देण्यात आली आहे.
जिओनी ए1 लाईट या फोनला मेटॅलिक लुक असून त्याची बॉडी डिझाईन फोनला एक वेगळाच लूक देते. हा फोन ऑक्टा कोअर 64 बिट प्रोसेसर वर चालतो. यामध्ये 3GB रॅम देण्यात आली असून इंटरनल मेमरी 32GB आहे. ही मेमरी एक्स्टरनल मेमरी कार्डच्या सहाय्याने 256GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
जिओनी ए1 लाईट या फोनमध्ये 20 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे सेल्फीप्रेमींसाठी हा मोबाईल एक चांगला ऑप्शन ठरू शकतो.