नवी दिल्ली : जिओनीने नवा S10 Lite हा स्मार्टफोन लाँच केलाय. मे महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आलेला Gionee S10 मधील व्हेरिएंट आहे. कंपनीने भारतात या स्मार्टफोनची किंमत १५,९९९ रुपये इतकी ठेवलीये. हा फोन गोल्ड आणि ब्लॅक रंगात उपलब्ध आहे. 


हे आहेत फीचर्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ड्युअल सिमवाल्या या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड ७.१ नॉगट आहे. यात ५.२ इंचाचा डिस्प्ले देण्यात आलाय. या स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅमसह १.४ गिगाहर्टझ क्वाडकोर स्नॅपड्रॅगन ४२७ प्रोसेसर देण्यात आलाय. 


यात १३ मेगापिक्सेल रेयर कॅमेरा तर सेल्फीप्रेमींसाठी १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. इंटरनल मेमरी ३२ जीबी असून २५६ जीबीपर्यंत वाढवता येते. कनेक्टिव्हिटीसाठी ४जी VoLTE, वायफाय, ब्लूटूथ, एफएम रेडिओ, मायक्रो यूएसबी आणि 3.5mm ऑडिओ जॅक देण्यात आलाय.


ग्राहकांसाठी नवी ऑफर


एस १० liteलाँचसह ऑफर्सही देण्यात आल्यात. हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दोन पेटीएम कॅशबॅक व्हाऊचर कोड्स दिले जाते. या द्वारे ग्राहकांना पेटीएम मॉलमधून कमीत कमी ३५० रुपयांच्या खरेदीवर २५० रुपयांचे कॅशबॅक मिळेल.