WhatsApp Setting: व्हॉट्सअ‍ॅप हे लोकप्रिय अ‍ॅप असून मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या पार्टनरच्या अकाउंटवरही लक्ष ठेवू शकता. पण यासाठी तुम्हाला तुमच्या पार्टनरकडे पासवर्ड मागावा लागतो. तेव्हाच तुम्ही त्यांचं अकाउंट एक्सेस करू शकता. पण पासवर्ड न मागताही स्मार्टफोनवर तुमच्या जोडीदाराचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट बघणं शक्य आहे. आज तुम्हाला अशीच एक आयडिया सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला वारंवार पासवर्ड मागण्याची गरज भासणार नाही. यासाठी तुम्हाला फक्त एक सेटिंग करावी लागेल. त्यानंतर तुम्ही चॅटिंग पाहण्यास पात्र असाल. तुम्हाला लॅपटॉप किंवा तुमच्या स्मार्टफोनवर चॅट पाहायचं आहे हे ठरवा आणि यापैकी एक ऑप्शन निवडू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचं ऑनलाइन व्हॉट्सअ‍ॅप चॅट पाहायची असेल. तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या लॅपटॉप किंवा फोनवर जाऊन Whatsapp-Web उघडावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पार्टनरच्या फोनवर जाऊन व्हॉट्सअ‍ॅप ओपन करावे लागेल आणि डिव्हाइस लिंक करून तुमच्या फोन किंवा लॅपटॉप कोड स्कॅन करावे लागेल. तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करताच, तुमच्या लॅपटॉप आणि फोनमध्ये भागीदाराचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट उघडेल.


GPay करताना आताही मिळवू शकता Cashback! पेमेंट करताना या ट्रिक वापरून पाहा


व्हॉट्सअ‍ॅप जोपर्यंत तुम्ही लॉग आउट करत नाही तोपर्यंत ते तसंच सुरु राहील. यामुळे पार्टनरच्या WhatsApp खात्यात होणार्‍या सर्व चॅटिंग, मीडिया फाइल्स पाहू शकता आणि नियंत्रित देखील करू शकता. तुम्ही अगदी सहजतेने ही प्रक्रिया करू शकता. हा पर्याय केवळ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वापरवा, कारण गैरवापर करणं हा कायद्याने गुन्हा आहे.