नोकियाचा ३३१० थ्री जी फोन येतोय, पाहा फिचर्स
याची किंमत भारतीय चलनानुसार ४,६०० रुपये आहे.
नवी दिल्ली : नोकियाच्या प्रमोटर 'एचएमडी ग्लोबल'ने 'नोकिया ३३१०' चा एक नवा थ्री जी फोन लॉन्च केला आहे. नव्या 'नोकिया ३३१० थ्री जी' फीचर फोनमध्ये वॉर्म रेड, पिवळा, एझर आणि चारकोल कलर व्हेरिएन्ट पाहायला मिळणार आहेत.
हा फोन सध्या ऑस्ट्रेलियन मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आला असून इतर देशांमध्येही लवकरच उपलब्ध होईल. नोकिया ३३१० ची विक्री ऑस्ट्रेलियात १६ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
या फोनमध्ये फिजिकल कीबोर्ड, मायक्रो यूएसबी पोर्ट, ब्लूटूथ २.१, एफएम रेडिओ अशी फिचर्स आहेत. त्याची किंमत आहे ८९.९५ ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार ४,६०० रुपये आहे.
एचएमडी ग्लोबलने नोकियाच्या लोकप्रिय मॉडेलला नोकिया ३३१० ला एमडब्ल्यूसी २०१७ मध्ये नव्या लूकसह आणले होते. त्यानंतर फिनलॅंड कंपनीने नवीन नोकिया ३३१० ला मॉर्डन ट्विस्ट संबोधले होते. नंतर नोकिया ३३१० ला नव्या लूकमध्ये २ जी सपोर्टसह सुरु करण्यात आले. पण नोकिया ३३१० आता नव्या थ्री जी व्हेरिएंट्समध्ये आला आहे. थ्री जी कनेक्टिव्हिटीमुळे युजर्सला हायर स्पीड मोबाइल डेटा स्पीडचा आनंद घेता येणार आहे.
नोकिया ३३१०, थ्री जीची वैशिष्ट्ये
डिस्प्ले : २.४० इंच
रिझोल्यूशन : २४०x३२०पिक्सल
ओेएस : फिचर ओएस
कॅमेरा : २ मेगापिक्सेल
स्टोरेज : १६ एमबी, ३२ जीबी एक्स्पांडेबल
बॅटरीची क्षमता : १२०० mAh
डायमेंशन : ११७ x ५२.४ x १३.३५ मिमी
वजन : ८८.२ ग्रॅम