नवी दिल्ली : रिलायन्स जिओ फोन असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जिओ फोनमध्ये लवकरच व्हॉट्सअॅपची सुविधा मिळणार आहे. काय ऑपरेटिंग सिस्टमवर चालणाऱ्या जिओ फोनमध्ये सध्या व्हाट्सअॅप सपोर्ट करत नाही. व्हॉट्सअॅप सुरु करण्यासाठी कंपनी व्हाट्सअॅपशी चर्चा करत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. गेल्या महिन्यात कंपनीने जिओ फोनसाठी फेसबुक अॅपचे विशेष व्हर्जन लॉन्च केले होते. या अॅपमध्ये पुश-नोटिफिकेशन, व्हिडिओ आणि एक्सटरनलकंटेंट लिंकला सपोर्ट करणारे फिचर सामिल आहेत.


लवकरच व्हॉट्सअॅपचा वापर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WABetaInfo च्या नुसार कंपनी KaiOS साठी एक नवीन अॅपवर काम करत आहे. त्यामुळे जिओ फोन युजर्संना लवकरच व्हॉट्सअॅपचा वापर करता येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. 
WaBetaInfo च्या ऑफिशियल ब्लॉगनुसार, लेटेस्ट व्हॉट्सअॅप बिटा विंडोज फोन अॅप 2.18.38 मध्ये एक नवीन KaiOS अॅप बनवले जात आहे. काय ओएसचा जिओ फोन भारतीय युजर्समध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. आतापर्यंत ६० लाखांहुन अधिक युनिट विकले गेले आहेत. व्हॉट्सअॅपचे जगभरात दीड अरब युजर्स आहेत. आणि अजूनही युजर्स वाढण्याची शक्यता आहे.


फोनचे फिचर्स


एका सिमच्या जिओफोनमध्ये २.४ इंचाचा 240x320 पिक्सल रिजोलूशन असलेला क्यूडब्ल्यूवीजीए डिस्प्ले आहे. फोनमध्ये १.२ गीगा हर्टजचे SPRD 9820A/QC8905 डुअल कोर प्रोसेसर दिले आहेत. फोनमध्ये माली-४०० जीपीयू इंटिग्रेटेड आहे. त्याचबरोबर यात ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी चे इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. त्याचबरोबर मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने ही मेमरी १२८ जीबी पर्यंत वाढवण्यात येते.  


कनेक्टिव्हिटीसाठी


कंपनीने या फोनमध्ये 2 MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर VGA फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये २००० mAh ची बॅटरी आहे. १२ तासांचे टॉक टाईम आणि १५ दिवसांचे स्टॅंडबाय टाईम मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी यात 4G व्हीओएलटीई, ब्लुटूथ व्ही ४.१, वायफाय, एनएफसी, एफएम रेडीआो, जीपीएस आणि युएसबी २.० सपोर्ट करेल.