मुंबई : सध्या बहुतेक मोबाईल युझरच्या फोनमध्ये जिओचं सिम कार्ड वापरले जात आहे, त्यामुळे जिओचे युजर्स सुद्धा जास्त आहेत. त्यामुळे आपल्या ग्राहकांसाठी कंपनी काही ना काही वेगळं करत असते. आता देखील रिलायन्स रिटेल ग्राहकांना रिलायन्स जिओच्या तीन प्रीपेड प्लॅनवर 20 टक्के कॅशबॅक देत आहे. कंपनीने तीन रिचार्ज प्लॅनवर कॅशबॅक ऑफर सुरू केली आहे. रिलायन्स जिओ वापरकर्ते 249, 555 आणि 599 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर कॅशबॅक घेऊ शकतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही MyJio ऍप किंवा Jio च्या अधिकृत वेबसाइटवरून रिचार्ज कराल तेव्हाच हा कॅशबॅक तुम्हाला मिळेल. टेलिकॉम ऑपरेटर वापरकर्त्यांच्या जिओ खात्यात कॅशबॅक जमा करेल, जे भविष्यातील रिचार्जसाठी वापरले जाऊ शकते.


जिओची ही कॅशबॅक ऑफर फक्त तीन प्लॅनवर लागू होईल ज्याची किंमत 249 रुपये, 555 रुपये आणि 599 रुपये आहे. या प्लानची वैधता 84 दिवसांची आहे आणि दररोज 2GB हाय स्पीड डेटा उपलब्ध आहे.


249 रुपयांचा प्लान


जिओच्या या 249 रुपयांच्या प्लानमध्ये रिलायन्स जिओकडून कॅशबॅक देण्यात येत आहे. या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांविषयी बोलायचे झाल्यास, तुम्हाला दररोज 2GB डेटासह 28 दिवसांची वैधता मिळते. कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग सुविधा आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहे.


555 रुपयांचा प्लॅन


555 रुपयांच्या या जिओ प्रीपेड प्लानमध्ये, वापरकर्त्यांना 20% कॅशबॅक देखील दिले जात आहे. या प्लानमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा उपलब्ध आहे, ज्याची वैधता 84 दिवस आहे. यासह, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत.


599 रुपयांचा प्लान


599 रुपयांच्या या प्रीपेड प्लानमध्ये 20 टक्के कॅशबॅक आहे. या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांविषयी बोलायचे झाल्यास, दररोज 2GB डेटासह 84 दिवसांची वैधता मिळते. त्यानुसार, हा प्लॅन दररोज 168 जीबी डेटा आणि 100 एसएमएस देते.


वर नमूद केलेल्या सर्व जिओ रिचार्ज प्लॅनसह, JioCinema, JioTV, Jio Security, Jio News आणि Jio Cloud सारख्या Jio अॅप्समध्ये प्रवेश मोफत दिला जात आहे.