मुंबई : शाओमी कंपनीचा Redmi Y3 लवकरचं ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. हा मोबाईल भारतीय बाजारात 24 एप्रिलला लॉन्च होणार आहे. Y सीरीजच्या या मोबाईलमध्ये उच्च प्रतिचा सेल्फी कॅमेराचा उपयोग करण्यात आला आहे. सध्या सेल्फीचं वेड असल्यामुळे Redmi कंपनीने या पार्श्वभूमीवर मोबाईलमध्ये सेल्फी कॅमेरा हे स्पेशल फीचर दिलं आहे. लीक टिजच्यानुसार या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सुपर सेल्फी कॅमेरा वापरण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा मोबाईल वॉटर फ्रुप म्हणजे डच सेल्फी कॅमेरा असेल. मीडिया अहवालाच्यानुसार, रेडमीने उच्च रिझोल्यूशनसाठी ISOCELL Bright GD1 प्रतिमा सेन्सरचा वापर केला आहे. अशी अपेक्षा आहे की, या फोनमध्ये अधिक शक्तिशाली बॅटरी असेल. अहवालानुसार, या फोनमध्ये 4000 एमएएच बॅटरी असेल. कंपनीकडून स्पेसिफिकेशन्सच्या संबंधित कोणतीही विशिष्ट माहिती नाही.



अहवालानूसार, हा मोबाईल MIUI 10 वर आधारित असेल जो अँड्रॉइड Pie वर काम करेल. 802.11 b/g या उच्च प्रतिच्या वायफायला सपोर्ट करेल. मिळालेल्या माहितीनुसार, 24 एप्रिलला दुपारी 12 वाजता हा मोबाईल लॉन्च केला जाणार आहे.