मुंबई : व्हॉट्सअप युजर्ससाठी व्हॉट्सअप नवे फीचर आणले आहे. नवीन वर्षात हे व्हाटस्अॅपचे फीचर आहे. व्हिडीओ  कॉल सुरु असताना व्हॉइस कॉलही घेता येणार आहेत.


 या फीचरची  उत्सुकता 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता व्हॉट्सअपवरून ग्रुप व्हिडीओ आणि ऑडिओ कॉलिंग करता येणार आहे. आता या फीचरची तुम्हालाही उत्सुकता असेल. हे फीचर नवीन वर्षात अर्थात २०१८च्या सुरुवातीला आणले आहे. व्हॉटस्अॅपवरील या नव्या अपडेटनुसार यापुढे व्हिडीओ कॉल सरु असताना व्हॉइस कॉलही घेता येणार आहे.


असा करा वापर


व्हिडीओ कॉल सुरु असताना व्हॉइस कॉलही घेता येणार आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरील क्विक बटण दाबावे लागेल. त्यानंतर तुमचा कॉल स्विच करावा लागेल. नव्या अपटेडमुळे व्हॉइस कॉल की व्हिडीओ कॉल असा  पर्याय युजर्ससमोर असणार आहे. सध्या २.१८.४ व्हर्जनसाठी ही सुविधा उपलब्ध आहे, ही माहिती WABetaInfo ने दिली आहे.


याआधी फेसबुकची सुविधा


दरम्यान, व्हॉट्सअपकडून या फीचरची टेस्टिंग सुरू होती. अँड्रॉईडच्या बिटा व्हर्जनवर या फीचरची तपासणी केली गेली आहे. व्हॉट्सअॅपवर ग्रुप व्हिडीओ कॉलिंग फीचर सुरू होण्याची चर्चा होती, मात्र त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. फेसबुकवर ग्रुप व्हिडिओ कॉलिंग फीचर उपलब्ध आहे. फेसबुकवर ग्रुप कॉलिंग करण्यासाठी फेसबुक मेसेंजर असणं आवश्यक आहे.