नवी दिल्ली : नुकतेच गुगलने एका खास कामासाठी ३० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. यांचे कामाचे स्वरूप ऐकले तर तुम्ही आश्चर्य व्यक्त कराल. गुगलच्या जीबाईक्स गेल्या काही दिवसांपासून चोरी होत आहेत. आठवड्याला १०० ते २५० ‘जीबाईक्स’ची चोरी होत असल्याने सायकल शोधून परत आणण्याचे हे काम आहे.


हे आहे काम...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगलच्या कर्मचाऱ्यांना पार्कमध्ये फेरफटका मारण्यासाठी गुगलने खास हजारो सायकल्स कॅम्पसमध्ये ठेवल्या आहेत. या सायकल कंपनीच्या लोगोच्या रंगात रंगवलेल्या आहेत. याला गुगलने जीबाईक्स असे नाव दिले आहे. कर्मचारी या जीबाईक्स चालवतात. पण गेल्या काही दिवसांपासून या सायकल्सच्या संख्येत घट होत आहे. आठवड्याला किमान १०० ते २५० सायकल्स चोरी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे या चोऱ्या थांबवण्यासाठी गुगलने ३० जणांची नेमणूक केली आहे. सायकल्सवर लक्ष ठेवणं, हरवलेल्या सायकल्स शोधून परत मिळवणं असं या कर्मचाऱ्यांच्या कामाचं स्वरूप असेल अशी माहिती वॉल स्ट्रीट जर्नलनं दिली आहे.


तंत्रज्ञानाचीही मदत


सायकल चोरी थांबवण्यासाठी गुगल आता नवीन तंत्रज्ञान विकसित करणार आहे. यासाठी गुगलने आधुनिक तंत्रज्ञान युक्त लॉक तयार केले आहेत. जे लॉक फक्त गुगलचे कर्मचारी मोबाईलच्या माध्यमातून उघडू शकतात. मात्र हे तंत्रज्ञान लागू होण्यासाठी काही कालावधी लागेल. म्हणून तुर्तास जीबाईक्सची चोरी थांबवण्यासाठी गुगलने ३० कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.