मुंबई: भारतासह अनेक देशांमध्ये अचानक क्रेप्टोकरन्सी जास्त पॉप्युलर झालं. त्यासोबतच फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. मोठ्या संख्येनं लोक बिटकॉइन आणि क्रेप्टोकरन्सीमध्ये पैसे गुंतवू लागले. तुम्हीही जर अशा पद्धतीनं गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर थांबा. कारण नुकताच गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून 8 अॅप्स बॅन केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे 8 एप्स क्रेप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना फसवून बँक अकाऊंट लुटण्याचा काळाधंदा करत आहेत. त्यामुळे तुम्हीही याला बळी पडू नका नाहीतर तुमच्या कष्टाचा पैसा कुणीतरी दुसराच घेऊन जाईल. त्यामुळे सावधान राहा आणि आजच आपल्या फोनमधून हे 8 एप्स डिलीट करा.


सिक्योरिटी फर्म ट्रेंड माइक्रोने दिलेल्या अहवालानुसार तपासात असं दिसलं की 8 धोकादायक एप्स जाहिराती दाखवून आणि सबस्क्रिप्शन (महिन्याला सरासरी 1100 रुपये) आणि अतिरिक्त पैसे घेऊन युझर्सची फसवणूक करत आहेत. एकदा पैसे भरल्यानंतर, युझर्सचं खातं हॅक केलं जातं. नंतर ठग त्याचं खातं रिकामं करतात.


ट्रेंड मायक्रोने गुगल प्लेला याबद्दल याबाबत माहिती दिली आहे. ती एप्स प्ले स्टोअरमधून काढून टाकली आहेत.प्ले स्टोअरमधून काढून टाकल्यानंतरही, हे एप्स तुमच्या फोनमध्ये असतील तर तुमच्या फोनमधून आजच ती डिलीट करणं गरजेचं आहे. नाहीतर तुमचं बँक अकाऊंट रिकामं होऊ शकतं. यापुढे देखील असे एप्स डाऊनलोड करणं टाळाच. 


हे अॅप चुकूनही डाऊनलोड करू नका किंवा केले असतील तर तातडीने डिलीट करा


1. बिट फंड्स (BitFunds) – Crypto Cloud Mining
2. बिटकॉइन माइनर (Bitcoin Miner) – Cloud Mining
3. बिटकॉइन Bitcoin (BTC) – Pool Mining Cloud Wallet
4. क्रिप्टो होलीक (Crypto Holic) – Bitcoin Cloud Mining
5. डेली बिटकॉइन रिवार्ड (Daily Bitcoin Rewards) – Cloud Based Mining System
6. बिटकॉइन 2021 (Bitcoin 2021)
7. माइनबिट प्रो (MineBit Pro) - Crypto Cloud Mining & btc miner
8. इथेरियम Ethereum (ETH) - Pool Mining Cloud


अन्य 120 एप्सवर गुगलची नजर


एका अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार 120 पेक्षा जास्त बनावट क्रिप्टोकरन्सी एप्स अजूनही ऑनलाइन उपलब्ध आहेत. कंपनीने एका ब्लॉगमध्ये लिहिले, 'हे एप्स क्रिप्टोकरन्सी मायनिंगच्या नावाखाली लोकांना फसवण्यासाठी इन-अॅप जाहिराती दाखवतात. या एप्सने जुलै 2020 ते जुलै 2021 पर्यंत जगभरातील 4500 हून अधिक युझर्सची फसवणूक केली आहे. त्यामुळे असे कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी, एकदा त्याची खातरजमा करणं गरजेचं आहे.