Google या युजर्सच्या खात्यात थेट 201 रुपये ट्रान्सफर करणार, कसं ते जाणून घ्या
गुगल पे हे मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं डिजिटल पेमेंट अॅप आहे. गुगल पे कायम आकर्षक ऑफरमुळे युजर्संना आकर्षित करत असते.
मुंबई: गुगल पे हे मोठ्या प्रमाणात वापरलं जाणारं डिजिटल पेमेंट अॅप आहे. गुगल पे कायम आकर्षक ऑफरमुळे युजर्संना आकर्षित करत असते. जर तुम्ही Google Pay वापरकर्ते असाल तर तुम्हाला 201 रुपयांचा कॅशबॅक देखील मिळू शकतो. आता गुगल 201 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. त्यामुळे 201 रुपये आपल्याला मिळणार का? याबाबत गुगल पे युजर्समध्ये उत्सुकता आहे. या ऑफरसाठी तुम्हाला वेगळं काही करण्याची गरज नाही.
201 रुपयांचा कॅशबॅक मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा रेफरल कोड नव्या युजर्ससोबत शेअर करावा लागणार आहे. म्हणजेच नव्याने गुगल पे वापरण्याऱ्या युजर्ससोबत हा रेफरल कोड शेअर करावा लागेल. तुम्ही शेअर केलेल्या लिंकवरून, तो त्याच्या फोनमध्ये गुगल पे डाउनलोड करेल आणि नंतर त्याचे बँक खाते गुगल पे सोबत लिंक करेल. खाते लिंक केल्यानंतर जेव्हा नवीन युजर्स पहिल्यांदा एखाद्याला किमान एक रुपया पाठवेल, तेव्हा तुम्हाला तुमच्या बँक खात्यात 201 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तर नवीन युजर्सला 21 रुपयांचा कॅशबॅक मिळेल.
गुगल पे दोन्ही युजर्सचे पैसे थेट खात्यात ट्रान्सफर करेल. एका आर्थिक वर्षात गुगल पे कमाल 9000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देणार आहे. म्हणजे जर तुम्ही तुमची रेफरल लिंक एका आर्थिक वर्षात 45 पेक्षा जास्त लोकांसोबत शेअर केला तर तुम्हाला जास्तीत जास्त 9000 रुपये मिळतील.
गुगलने त्याच्या डिजिटल पेमेंट अॅप जीपेमध्ये एक नवीन भाषा जोडली आहे. यूपीआय आधारित हिंग्लिश ही भाषा जीपेमध्ये जोडली आहे. कंपनीने याआधी इंडिया इव्हेंटमध्ये याची घोषणा केली होती. हिंग्लिश भाषेच्या सपोर्टसह, 10 भाषा आता गुगल मध्ये समर्थित आहेत. यामध्ये इंग्रजी, हिंदी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, तमिळ आणि तेलगू यांचा समावेश आहे. तुम्हालाही यापैकी कोणतीही भाषा वापरायची असेल, तर तुम्ही वापरू शकता.