मुंबई: गुगल क्रोम वापरताना आपल्याला अनेकदा नोटिफिकेशन्स येत असतात. कधी बातम्या तर कधी आपण सर्च केलेल्या अपडेट्स पैकी काहीतरी सतत आपल्या क्रोमच्या साईटवर येत राहातं. त्यामुळे आपल्या सर्चमध्ये किंवा आपण करत असलेल्या कामात मोठा व्यत्यय येतो. नोटिफिकेशनची ही कटकट जर तुम्हाला होत असेल तर टेन्शन घेऊ नका आज आम्ही तुम्हाला या कटकटीपासून कशी सुटका करायची याच्या सोप्या टिप्स सांगणार आहोत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला जर तुमच्या क्रोममधील नोटिफिकेशनपासून सुटका हवी असेल तर सर्वात पहिल्यांदा क्रोम ओपन करा. वरच्या कोपऱ्यात उजव्या बाजूला सेटिंग्सचा पर्याय असेल. तिथे क्लिक केल्यानंतर प्राइवेसी आणि सिक्योरिटी पर्याय आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला नोटिफिकेशन सेटिंगचा पर्याय उपलब्ध होईल. तिथे तुम्हाला नको असलेल्या वेबसाईटला ब्लॉक करावं लागेल. हव्या असणाऱ्या वेबसाईटला Allow हा पर्याय निवडावा लागेल. 


मोबाईल सेफ ठेवणारा स्क्रीनगार्डच धोकादायक, आत्ताच काढून टाका, नाहीतर....


अनेकदा आपण डेक्सटॉप किंवा लॅपटॉपवर काम करत असताना उजव्या कोपऱ्यात बातम्यांचे अपडेट्स सतत येत राहतात. अशावेळी एक सोपा उपायही करता येईल. उजव्या कोपऱ्यात नोटिफिकेशन येतं त्यावर क्लिक केलं की Allow किंवा ब्लॉकचा पर्याय येतो. नको असलेले नोटिफिकेशन ब्लॉक करून टाकायचे त्यामुळेही कटकट दूर होते. 


WhatsApp Live Location ही खासियत तुम्हाला माहीत आहे का?


तिसरी गोष्ट म्हणजे क्रोमच्या सेटिंग्समध्ये प्रायव्हसि आणि सिक्युरिटी पर्याय असेल तिथे क्लिक करायची. Pop-ups and redirects पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. Sites can send pop-ups and use redirects  किंवा Don't allow sites to send pop-up तुम्हाला जो पर्याय हवा तो निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन नको असतील तिथे ब्लॉक हा पर्याय निवडायचा आहे. या काही टिप्सचा वापर करून तुम्ही नोटिफिकेशन्सपासून सुटका मिळवू शकता. त्यामुळे तुम्हाला कामात व्यत्यय येणार नाही. आपलं काम कटकट न होता पूर्णही होईल.