Google क्रोम बाऊझर संदर्भात अलर्ट, तुमची एक चूक पडू शकते महागात
Googleचं हे फीचर तुम्ही वापर असाल तर आजच अपडेट करा नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान
मुंबई: कोणतीही गोष्ट शोधायची असेल तर आपण प्रत्येकवेळी क्रोमचा आधार घेतो. अगदी मोबाईलपासून ते पीसीपर्यंत आपण गुगल क्रोम प्रत्येक गोष्टीसाठी वापरतो. तुमच्या फोनमध्ये किंवा पीसीवर जर तुम्ही गुगल क्रोम अपडेट करून घेतला आहे का? नसेल तर आजच घ्या. यामागचं कारण म्हणजे गुगलने अलर्ट पाठवला आहे. त्यामुळे तातडीने हे अपडेट करून घ्या नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं.
गुगल क्रोममध्ये एक छोटी त्रुटी होती. ही त्रुटी गुगलने शोधून काढली आणि नवीन अपडेटमध्ये तो बग काढून टाकला आहे. या त्रुटीचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात. त्यामुळे तुमचा डेटा हॅक होऊ शकतो असंही गुगलकडून अलर्ट देण्यात आला आहे. तुम्ही क्रोम अपडेट केलं नसेल तर त्याचा फायदा हॅकर्स घेतील.
जुन्या क्रोमच्या व्हर्जनमध्ये असलेल्या बगचा गैरवापर करून तुमची माहिती चोरली जाऊ शकते. हा बग आता क्रोमने काढला असून नवीन अपडेट दिला आहे. हा नवीन अपडेट तातडीनं ग्राहकांनी करणं गरजेचं आहे.
गुगल प्ले स्टोअरवर हजारो एप्स आहेत. युजर्स त्यांच्या गरजेनुसार ही एप्स डाऊनलोड करून त्याचा वापर करतात. मात्र प्ले स्टोअरमध्ये असेही काही एप्स आहेत जो तुम्हाला मोठा फटका देऊ शकतात. यासंदर्भातही गुगलने अलर्ट जारी केला आहे.
Zscalerच्या ThreatLabz सायबर सिक्युरीटी रिसर्चर्सने 11 एप्सबाबत माहिती दिली आहे, ज्यांच्यापासून लोकांना सावधान राहणं गरजेचं आहे. या एप्समध्ये जोकर फॅमिलीचे मेलवेअर आहे, जे तुमच्या स्मार्टफोनसाठी नुकसानदायक असतं. जोकरला लोकांची माहिती काढणं, ती चोरणं आणि एसएमएस मॉनिटर करण्यासाठी डिझाईन करण्यात आलं आहे.
ही Apps लगेच डिलीट करा
- Auxiliary Message
- Fast Magic SMS
- Free CamScanner
- Super Message
- Element Scanner
- Go Messages
- Travel Wallpapers
- Super SMS
-Translate Free
-PDF Converter Scanner
-Delux Keyboard
- Saying Message
-Free Affluent Message
-Comply QR Scanner
-PDF Photo Scanner
-Font Style Keyboard
-Private Message
-Read Scanner
-Print Scanner