Google Chrome Secret Features: गुगल क्रोम हे एक असं ब्राऊजर आहे, जिथे अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला हवी ती, हवी तशी आणि हव्या त्या पद्धतीतील माहिती मिळते. संपूर्ण जगात या ब्राऊजरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. प्रश्न कोणताही असो, त्याचं उत्तर गुगलकडे मिळतंच मिळतं (Google search). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकी वर्षे (Google) गुगल वापरणाऱ्यांना जणू या ब्राऊजरचे असंख्य बारकावे माहित आहेत. पण त्याचे काही असेही फिचर्स आहेत ज्याची फार कमीजणांना कल्पना आहे. असंच एक फिचर म्हणजे क्रोम रिडींग लिस्ट ( Reading List). 


विद्यार्थ्यांची हे फिचर प्रचंड मदतीचं... (Google Feature helpful for students)


गुगलच्या Reading List Feature मध्ये तुम्ही लगेचच कोणताही लेख सेव्ह (Save) करु शकता. पुढे गरज पडल्यास तुम्ही ते लेख हवं तेव्हा वाचूही शकता. परिणामी तुमच्या आवडीचा लेख कधीच Miss होणार नाही. 


हे माहित असायलाच हवं : PhonePe, Google Pay वापरताना तुम्ही 'ही' चूक करत तर नाही ना? तुमचं बँक खातं होऊ शकतं रिकामं


Reading List Feature आणि Bookmarks Bar फिचर जवळपास सारखे आहेत. या फिचर्सचा फायदा तुम्हाला करून घ्यायचा असेल, तर खालील मुद्दे वाचा.


- सर्वप्रथम डेस्कॉप किंवा लॅपटॉपवर गुगल क्रोम सुरु करा. 
- यानंतर उजव्या कोपऱ्यात वरच्या दिशेला प्रोफाईल फोटोसोबत दिलेल्या Side Panel Button वर क्लिक करा. 
- तुमच्या स्क्रीनवर एक पॅनल सुरु होईल, ज्यामध्ये 2 विभाग असतील. एक म्हणजे reading list आणि दुसरं म्हणजे Bookmarks 
- Reading List टॅबवर क्लिक करा जिथे तुम्ही सेव्ह केलेले लेख, माहिती वाचू शकता. 


वाचा : Google Pay ची ट्राजॅक्शन लिमिट किती? जाणून घ्या ट्राजॅक्शन लिमिट कशी वाढवायची


कसा Save करावा लेख, माहिती? 
- वाचताना पसंतीस पडलेल्या लेखाला सेव्ह करण्यासाठी त्याचा Reading List मध्ये समाविष्ट करा. 
- यानंतर Reading List सेक्शनमध्ये Add Current Tab नावाच्या बटणावर Click करा. तुम्हाला हवी ती माहिती इथं सेव्ह होईल.