Google Pay ची ट्राजॅक्शन लिमिट किती? जाणून घ्या ट्राजॅक्शन लिमिट कशी वाढवायची

google pay हे प्रसिद्ध upi आधारित मनी ट्रान्सफर अॅप आहे. त्याची सोपी इंटरफेस युसर्सला आवडते. पैसे ट्रान्सफर करण्याचा हा एक अतिशय लोकप्रिय मार्ग आहे.

Updated: Jan 25, 2022, 10:07 AM IST
Google Pay ची ट्राजॅक्शन लिमिट किती? जाणून घ्या ट्राजॅक्शन लिमिट कशी वाढवायची title=

मुंबई : Google Pay हे एक लोकप्रिय अॅप आहे. परंतू Google Pay दररोजच्या व्यवहारांवर मर्यादा असतात. परंतू तुम्ही तुमचा व्यवसाय किंवा दैनंदिन व्यवहारात जास्त ट्राजॅक्शन करीत असाल तर तुम्हाला ही मर्यादा कमी पडू शकते. 

व्यवहार मर्यादा किती ?

Google Pay वर बँक मर्यादेव्यतिरिक्त, त्याची स्वतःची मर्यादा देखील आहे. Google Payच्या माध्यमातून एका दिवसात 1 लाख रुपये पाठवू शकता. तसेच तुम्ही एका दिवसात जास्तीत जास्त 10 व्यवहार करू शकता. 

याशिवाय तुम्ही एका दिवसात 2000 रुपयांपेक्षा जास्त मागणी करू शकत नाही. म्हणूनच अनेक वेळा असे दिसून आले आहे की बँकेची मर्यादा जास्त असूनही वापरकर्ते Google Pay वरून पैसे ट्रान्सफर करू शकत नाहीत. वेबसाइटवर जाऊन तुम्ही तुमच्या बँकेची मर्यादा तपासू शकता.

मर्यादा कशी वाढवायची?

Google Pay वरील लिमिट संपल्यानंतर तुम्हाला सहसा एक दिवस प्रतीक्षा करावी लागते. दुसऱ्या दिवशी तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्याची लिमिट परत मिळेल. याशिवाय, तुम्ही ऑनलाइन पद्धत नेट बँकिंग किंवा एनईएफटी वापरू शकता. याशिवाय तुम्ही Google Payच्या कस्टमर केअरला कॉल करून UPI ​​मर्यादा वाढवण्याची विनंती करू शकता.

अशा प्रकारे संपर्क करा

Google Pay च्या ग्राहक सेवेशी संपर्क साधण्यासाठी, तुम्ही त्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता https://support.google.com/pay/india/?hl=en#topic=10094979 "आणखी मदत हवी आहे?" पर्यायाच्या खाली "आमच्याशी संपर्क साधा" हा पर्याय निवडून तुम्ही कस्टमर केअरशी बोलू शकता.