नवी दिल्ली : इंटरनेटवर एक्सेस करण्यासाठी बहुतांश लोक गुगल क्रोम, फायरफॉक्स, सफारी आणि अन्य ब्राउजरचा वापर करतात. परंतु युजर्ससमोर सध्या एक मोठी अडचण आहे. त्यासाठी सेंटिंग्समध्ये जाऊन तुम्हाला काही बदल करणे गरजेचे आहे. गोपनीयता जपून ठेवण्यासाठी हे बदल करणे गरजेचे असणार आहे. 
 
 या सेंटिंग्स बदला.
 वॉइस  असिस्टंटमुळे तुमची गोपनियता अडचणीत येऊ शकते.  गुगल क्रोम आणि फायरफॉक्स सारख्या ब्राउजरमध्ये हा चिंतेचा विषय बनत आहे. तुम्ही जाहिरातींना बंद करू शकत नाही परंतु अनेक नवीन अपडेट्स आले आहेत. त्यामाध्यमातून तुम्ही तुमची गोपनीयता अबाधित राखू शकता. गुगलने इंडिपेंडंट डेवलपर्सला प्रायव्हसी-फोकस एक्सटेंशन जारी करण्याची परवानगी दिली आहे. जर तुम्ही क्रोमवर अधिक प्रायव्हेट ब्राउजिंगचा अनुभव घेण्यास इच्छुक असाल तर या स्टेप फॉलो करा.
 
 1 गुगल क्रोम वेब स्टोअर ओपन करा
 2 उजवीकडे असलेल्या एक्स्टेंशनवर क्लिक करा आणि सर्च बारमध्ये त्याचे एक्स्टेंशन चे नाम टाकून सर्च करा
 3 त्यानंतर Add to chrome वर क्लिक करा
 4 एक डायलॉग बॉक्स दिसून येईल. ज्यामध्ये आपल्या ब्राउजरच्या एक्स्टेंशनजवळ परवानग्या दिसून येतील.
 5 एक्स्टेंशनला आपल्या ब्राउजरमध्ये आणण्यासाठी त्यावर क्लिक करा