मुंबई: आजच्या कामगार दिनानिमित्त गुगलने आपल्या खास शैलीत डूडल बनवून कामगारांना शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा दिवस (१ मे) हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. कामगार दिनाची सुरूवात १९व्या शतकाच्या अखेरीस झाली. जेव्हा अमेरिकेत ट्रेड यूनियन आणि मजदूर आंदोलने वाढत होती. तेव्हा कामगार दिन जाहीर करण्यात आला. भारतातही अनेक राज्यांमध्ये एक मे हा कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्वजनीक सुट्टी साजरी केली जाते.


काय आहे आजचे डूडल?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगल डूडलबाबत बोलायचे तर, आजचे डूडल हे काहीसे हटके आहे. आजच्या डुडलच्या माध्यमातून जगभरातील कामगारांचे महत्त्व दाखवण्यात आले आहे. हलक्याशा निळ्या रंगात डूडलने स्टेथोस्कोप, सुरक्षा हेल्मेट, नट, बोल्ट, पेंटींग रोल, बॅटरी, रबर ग्लोब, चश्मे, टॉर्च, चप्पल, कागदपत्रे, यांसारख्या अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. भारतातही हा दिवस 'आंतरराष्ट्रीय कामगार दिवस' म्हणून साजरा केला जातो.


का साजरा केला जातो कामगार दिन


सुरूवातीच्या काळात ४ मे १८८६मध्ये अमेरिकेतील कामगार संघटनांनी आंदोलने केली होती. या संघटनांनी एकत्र येत सरकारला ठणकावून सांगितले की आम्ही आठ तासच काम करू. या मुद्यावर कामगरांनी शिकागोतील रेमार्केट चौकात एक शांततापूर्ण रॅली कराढली होती. कामगारांच्या याच रॅलीत शिकागो येथे एक बॉम्बस्फोट झाला. यानंतर उडालेल्या निर्माण झालेल्या गदारोळावर पोलीस नियंत्रण मिळवू शकले नाहीत. जमावाला नियंत्रणात आणन्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. यात अनेक कामगार मृत्यूमुखी पडले. त्यानंतर १८८९मध्ये जाहीर करण्यात आले की, हेमार्केटमध्ये झालेल्या गोळीबारात मारल्या गेलेल्या कामगारांच्या स्मरणार्थ १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली. अमेरिकेतील हेमार्केट स्क्वायरमध्ये जिथे ही घटना घडली त्या ठिकाणाला १९९२ मध्ये शिकागो लँडमार्क असे नाव देण्यात आले.