मुंबई : प्रत्येक दिवसा मागे काही विशेष कारण असते. त्याचप्रमाणे आजच्या दिवसालाही अनन्यसाधारण महत्व आहे. कारण केप कॅन्व्हेरलवरून १६ जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग यांनी 'अपोलो-११' यानाने चंद्राकडे झेप घेतली. याच दिवसाचे औचित्य साधत गुगलने  डूडलच्या माध्यमातून नील आर्मस्ट्राँग यांच्या कर्तृत्वाला मानवंदना दिली आहे. त्याचबरोबर  डूडलमध्ये असणाऱ्या प्ले बटणावर क्लिक केल्यास ‘अपोलो-११’च्या चंद्रमोहिमेच्या प्रवासाची सर्व माहिती मिळते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेने चंद्रावर पाठवलेल्या 'अपोलो-११' अवकाशयानास आज तब्बल ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. डूडलच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या साडेचार मिनिटांच्या व्हि़डिओमध्ये 'अपोलो-११' अवकाशयानाचा प्रवास दाखवण्यात आला आहे.


अॅनिमेशच्या जगात साकारण्यात आलेल्या या व्हिडिओला मायकल कॉलिन्स यांनी आवाज दिला आहे. १६ जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग, एड्विन (बझ) ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स या तीन अवकाशविरांनी 'अपोलो-११' यानाने चंद्राकडे मार्गक्रमण केले होते.