मुंबई : जूडी नावाच्या मालवेयरमुळे 3.65 कोटी अँड्राईड फोन प्रभावित झाले आहेत. दो दिवसात गूगलने अँड्रायड ओएसमध्ये बग शोधणाऱ्यास २ लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. सायबर संरक्षण फर्म चेक पॉइंटनुसार, प्ले स्टोरमधून अनेक मालवेयर अॅप डाऊनलोड केले गेले आहेत.


४५ लाखांपासून १.८५ कोटी वेळा ते डाउनलोड केले गेले आहेत. यामध्ये अनेक मालवेयर अॅप तर प्लेस्टोरवर आहे. वेबसाइट एक्सट्रीमटेक डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, मोबाईलमध्ये मालवेयर आणि संरक्षणाचं उल्लंघनांच्या घटना जुन्या ओएस असणाऱ्या फोनमध्ये आढळून आले. अँड्राईडचे नवीन फोन सुरक्षित आहेत. गूगलने ज्याला अनेक वर्षांपूर्वी विकसित केले होते अशा सिस्टीमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे गूगलने नव्या अँड्रायडमध्ये कोणताही बग शोधणाऱ्या व्यक्तीला बक्षीस जाहीर केलं आहे.