गुगलने (Google) अखेर आपली व्हॉईस आणि व्हिडिओ चॅट गुगल हँगआउटची (Google Hangout) सेवा बंद केली आहे. 2013 मध्ये ही मोफत मेसेजिंग सेवा पहिल्यांदा अॅप म्हणून सुरू करण्यात आली होती. कंपनीच्या या प्लॅटफॉर्मला फारसे यश मिळाले नाही. जवळपास 9 वर्षांच्या अपयशानंतर, कंपनीने गुगल हँगआउट पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) वर हे विनामूल्य अॅप वापरता येणार नाहीये. तसेच गुग क्रोमवरही  (Chrome)याचा वापर करता येणार नाही. Google Stadia, YouTube Originals, Google+, Google Allo आणि Google Play Music सारख्या सेवांमध्ये आता गुगुल हॅंगआउटचाही समावेश करण्यात आला आहे. (Google has stopped Google Hangout service forever save your data)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगलने (Google) 2020 पासूनच युजर्सना हॅंगआउटपासून (Hangouts) पासून दूर नेण्यास सुरुवात केली होती. यावेळी त्यांनी पर्याय म्हणून हॅंगआउट ऐवजी गुगल चॅट (Google Chat) वापरण्यासाठी उपलब्ध करुन दिले होते. कंपनीने तेव्हा गुगल हॅंगआउट वापरणाऱ्यांना  (Google Hangouts) वापरणाऱ्यांना मेल (Gmail) मध्ये किंवा वेगळ्या अॅपद्वारे गुगल चॅट (Google Chat) अपडेट करण्यास सांगितले होते. तसेच 2022 च्या सुरुवातीला गुगलने अधिकृतपणे अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) युजर्ससाठी हॅंगआउटची सेवा बंद करणे सुरू केले होते. जुलैमध्ये अँड्रॉइड आणि आयओएसवरुन ही सेवा पूर्णपणे बंद झाली.


डेटा कसा डाउनलोड करायचा?


तुम्हाला जर गुगल हँगआऊटवरुन तुमचा डेटा परत मिळवायचा असेल तर तुम्हाला काही खास गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही फक्त 1 जानेवारी 2023 पर्यंतच तुमचा डेटा डाउनलोड करू शकता.


खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही डेटा डाउनलोड करू शकता.


1:Google Takeout वर जा आणि तुम्ही Hangouts सह वापरत असलेल्या Google अकाउंटवर साइन इन करा.
2 : यातील अॅप्समध्ये फक्त Hangouts निवडा आणि बाकीचे पर्याय स्किप करा.
3 :  त्यानंतर पुढील स्टेपवर क्लिक करा.
4: नंतर डिलीव्हरी मेथडमध्ये, तुम्हाला किती बॅकअप डाउनलोड करायचा आहे ते निवडा. Hangouts लवकरच Google Chatमध्ये अपडेट केले जात असल्याने असल्याने, वन टाईम डाउनलोड ऑप्शन सिलेक्ट करा.
5: फाइल ऑप्शन सिलेक्ट करा आणि मग एक्सपोर्टवर क्लिक करा.