Google I/O 2024 : तंत्रज्ञान क्षेत्रात जग बरंच पुढे जात असतानाच गुगल, अॅपलसारख्या कंपन्यांकडूनही नवनवीन तंत्रज्ञान नवनवीन रुपात जगासमोर आणलं जात आहे. त्यातल्याच Goolge I/O इवेंटची सध्या सर्वदूर चर्चा सुरु असून, त्या इवेंटमध्ये AI नं विशेष लक्ष वेधलं. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sudar Pichai) यांनीच या कार्यक्रमाची सुरुवात Gemini संदर्भातील चर्चेनं केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगलच्या या मेगाइवेंटमध्ये एआयपासून गुगलचं व्हिडीओ जनरेटीव एआय मॉडेल VEO लाँच केंल. याशिवाय इतरही काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या. कंपनीकडून या इवेंटमध्ये Project Astra सुद्धा लाँच केलं. गुगलच्या या नव्या प्रोजेक्टअंतर्गत भविष्यातील AI असिस्टंट तयार करण्यासाठी केला जाईल. गुगलचं हे नवं फिचर साधारण, OpenAI आणि GPT 4o सारखंच असून, तुमच्या मोबाईल कॅमेरामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीची सविस्तर माहिती हे टूल देणार आहे. 


Project Astra चा नेमका वापर काय? 


गुगलचं हे असिस्टंट टूल कॅमेरामध्ये दिसणाऱ्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून भविष्यात तो डेटा गरज पडल्यास वापरताना दिसणार आहे. याचं एक प्रात्यक्षिक गुगलच्या या इवेंटमध्येही दाखवण्यात आलं. जिथं एआय टूल कॅमेरामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीसंदर्भात सविस्तर माहिती देत होतं. हे असिस्टंस टूल कोड वाचून त्यासंदर्भातील माहितीही देण्यास सक्षम असून, तुमच्या आजुबाजूच्या परिसरासंदर्भातील माहिती देण्याचं कामही हे टूल करतं. 


हेसुद्धा वाचा : कोणालाही धाराबावीबाहेर पाठवणार नाही; स्थानिकांच्या घरांबाबत आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे? 



अॅस्ट्राला तुम्ही कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारू शकता. असं हे कमाल फिचर सर्वसामान्य गुगल युजरपर्यंत येण्य़ासाठी काहीसा विलंब लागणार असला तरीही त्याचे काही फिचर्स Gemini अॅपवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे एखाद्या गोष्टीचा फोटो या मोबाईल कॅमेरातून टीपण्यात आला आहे आणि त्याच फोटोमध्ये असणारी एखादी गोष्ट तुम्ही शोधताय किंवा अनावधानानं तुम्हाला तिचा विसर पडला आहे, तर गुगलचं हे टूल तुम्हाला त्याची माहितीही देणार आहे. थोडक्यात Google चं हे टूल म्हणजे तंत्रज्ञानाचा नवा टप्पाच आहे, असं म्हणणं गैर ठरणार नाही.