भारतीयांसाठी गुगलवर सर्च करणे सोपे करेल `हे` नवे गुगल फिड !
नवी दिल्ली : भारतीयांसाठी गुगलवर कोणतीही माहिती सर्च करणे सोपे व्हावे यासाठी अॅनरॉईड आणि आयओएससाठी गुगल अॅपमध्ये नवीन फीड फिचर लाँच करण्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली.
नवी दिल्ली : भारतीयांसाठी गुगलवर कोणतीही माहिती सर्च करणे सोपे व्हावे यासाठी अॅनरॉईड आणि आयओएससाठी गुगल अॅपमध्ये नवीन फीड फिचर लाँच करण्याची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या फिचरमुळे युजरला स्मार्टफोनमधील वेबच्या साहाय्याने बातम्या आणि सूचना वेगाने होण्यास मदत होईल.
गुगलने सांगितले की, 'गुगल अॅप अपडेट किंवा लाँच केल्यास न्यूज फीडची सुविधा तुम्हाला प्राप्त होईल. यामुळे गेम्सच्या नवीन सुविधा, आकर्षक व्हिडीओ, नवीन संगीत, तुमच्या आवडीच्या गोष्टी आणि इतर अनेक गोष्टी बघणे सोपे होईल. हे इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषेत उपलब्ध आहे.
या नवीन फिचरमुळे मोबाईलवरील सर्च रिजल्टमध्ये तुम्हाला फॉलो बटन दिसेल. यावर क्लिक केल्यास युजर आपल्या आवडीचे चित्रपट, आवडीच्या स्पोर्ट्स टीम, आवडीचे संगीत किंवा बँड व इतर प्रसिद्ध व्यक्तींबद्दल माहिती आणि त्यासंबंधित ताज्या बातम्या पाहायला मिळतील.
विषय आवडीचा नसल्यास तुम्ही तो अनफॉलो देखील करू शकता. यासाठी त्या फीडमधील एका कार्डवर क्लिक करा आणि अनफॉलो करा. तो विषय फीडमधून काढून टाकायचा असल्यास गुगल अॅपवरील सेटिंग्सवरून तुम्ही तो काढू शकता, अशी माहिती गुगलने दिली.