Google Maps च्या नव्या फीचर्सबद्दल माहिती आहे का? प्रवासासोबत पैसेही...
तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन असतो. या स्मार्टफोनमधील अॅप्सच्या माध्यमातून आपण अनेक कामं चुटकीसरशी करतो.
मुंबई: तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या प्रत्येकाच्या हाती स्मार्टफोन असतो. या स्मार्टफोनमधील अॅप्सच्या माध्यमातून आपण अनेक कामं चुटकीसरशी करतो. हे अॅप्स आपली कामं खूप सोपी करतात. यापैकी एका अॅपचे नाव गुगल मॅप्स आहे. हे अॅप जे बहुतेक लोकांच्या स्मार्टफोनमध्ये आहे आणि बरेच लोकप्रिय आहे. नुकतेच, गुगल मॅप्समध्ये एक फीचर्स जारी केले आहे. या फीचरमुळे तुमचा प्रवास सोपा तर होईलच शिवाय तुमचे पैसेही वाचतील. या नवीन फीचरबद्दल जाणून घेऊया.
गुगल मॅप्सवर हे फीचर एप्रिलमध्ये रिलीज करण्यात आले होते. मात्र भारतात आता हे फीचर वापरता येणार आहे. भारतासह इंडोनेशिया, जपान आणि अमेरिकेतही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे; Android आणि iOS दोन्ही वापरकर्ते ते वापरू शकतात.
गुगल मॅप्स अॅपवर तुम्हाला संपूर्ण प्रवासासाठी किती टोल भरावा लागेल हे समजणार आहे. म्हणजे तुम्ही शहराबाहेर कुठेतरी जात असाल आणि गुगल मॅपवर मार्ग सेट कराल तेव्हा तुम्हाला कोणत्या मार्गासाठी किती टोल भरावा लागेल, यााबाबत माहिती मिळेल. टोलच्या किमतीनुसार तुम्ही मार्ग निवडू शकता. टोल-फ्री मार्ग निवडून तुम्ही पैसे वाचवू शकता.
हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला आधी तुमच्या स्मार्टफोनवर गुगल मॅप्स अॅप ओपन करावे लागेल, त्यानंतर रूट ऑप्शन पाहण्यासाठी वरील तीन डॉट्सवर क्लिक करावे लागेल किंवा स्क्रीनवर 'स्वाइप-अप' करावे लागेल. येथे तुम्हाला 'चेंज टोल सेटिंग्ज' हा पर्याय दिसेल ज्यामधून तुम्हाला कोणता टोल रस्ता निवडायचा आहे ते कळेल.