iPhone Vs Google: आयफोन हा सर्वात सुरक्षित स्मार्टफोन वापरला जातो. यामुळंच जगातील श्रीमंत व्यक्तींकडे आज आयफोन आहे. आयफोन हा सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप उपयुक्त असा स्मार्टफोन असल्याचे म्हटलं जाते. मात्र, आयफोनला मात देण्यासाठी गुगलकडून प्रयत्न केले जात आहेत. गुगलकडून एक नवीन अँटी व्हायरस सिस्टम लाँच करण्यात येत आहे. या सिस्टममुळं आयफोनप्रमाणेच अँड्रोइड डिव्हाइसमध्ये फसवणूक केली जाऊ शकत नाही. नवीन अपडेटनंतर तुमच्या अँड्रोइड डिव्हाइसमधून कोणी पैशांचा गंडा घालू शकत नाही. 


कोणीच पैसे नाही चोरू शकत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगलकडून लवकरत अँड्रोइड 15 अपडेट देण्यात येणार आहे. यातील काही फिचर्सची माहिती डेव्हलपर्स प्रीव्ह्यूमध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर बीटा अपडेटमध्ये काही फिचर्सची माहिती मिळणार आहे. लेटेस्ट अँड्रोइड 15 बीटा अपडेटबद्दल बोलायचे झाल्यास, अँड्रोइड स्मार्टफोनमध्ये आधीपेक्षा जास्त सिक्युरीटी मिळू शकते. त्याचबरोबर, गुगल प्ले स्टोरवर एक्स्ट्रा सिक्युरिटी देण्यात येणार आहे. ज्यामुळं युजर्सची फेक अॅपपासून सुटका होणार आहे. 


कोणत्या युजर्सना होणार फायदा 


नवीन लाँच होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये अँड्रोइड 15 अपडेट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर काही जुन्या स्मार्टफोनमध्येही अँड्रोइड 15 अपडेट देण्यात येणार आहे. म्हणजेच, ज्या स्मार्टफोनमध्ये नवीन अपडेट देण्यात येईल त्या स्मार्टफोनला नवीन अँटी व्हायरस अपडेट देण्यात येणार आहे. 


गुगलकडून दरवर्षी नवीन अँड्रोइड सॉफ्टवेअर अपडेट देण्यात येते. ज्याच्या मदतीने युजर्सना अँड्रोइड स्मार्टफोनमध्ये नवीन फिचर्स मिळतात. त्याचबरोबर नवीन सिक्युरीटी फिचर्स देण्यात येतात. यावेळी अँड्रोइड 15 अपडेटबद्दल दावा करण्यात येत आहे. यावेळी गुगल फोनमध्ये सगळ्यात तगडा सिक्युरीटी अपडेट देणार आहे.