मुंबई : गुगल, या सर्च इंजिनकडून कायमच युजर्सच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. सायबर क्राईमपासून युजर्सना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांची खासगी माहिती गोपनीय ठेवण्यासाठी गुगलकडून सतत काही धोरणांमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात येतात. (Google New Features)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीमेल असो किंवा मग गुगल चॅट, या गोष्टींमध्ये मागील काही वर्षांत झालेले बदल तुम्हीही अनुभवलेच असतील. आता पन्हा एकदा याच कारणांनी गुगलनं आणखी एक महत्त्वाचा बदल केला आहे. 


'रेड वॉर्निंग' असं या नव्या बदलाचं अर्थात नव्या फिचरचं नाव आहे. या फिचरअंतर्गत गुगलनं चॅट प्लॅटफॉर्ममध्ये फेक इनवाईट आणि लिंकनं युजर्सना धोक्याचा इशारा देण्यासाठी म्हणून चॅटमध्ये एक गडद लाल रंगाचं बॅनर जोडलं आहे. 


हे फिचर गुगलकडून रिलीज करण्यात आलं आहे. जे गुगल चॅटच्या मोबाईल आणि डेस्कटॉप अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये दिसणार आहे. ज्यामुळं कोणताही संशयास्पद मेसेज आल्यास गुगल त्याला ब्राइट रेड बॉक्समध्ये this invite is suspicious" म्हणत अधोरेखित करेल. 



'ब्लॉक' किंवा 'एक्सेप्ट एनिवे' असे पर्यायही याअंतर्गत तुम्हाला देण्यात आले आहेत. एका मोठ्या गडद लाल रंगाच्या बॅनरमध्ये warning sign हे invite सोबतच दिसेल. 


मोठ्या प्रमाणावर सध्या होणारे सायबर हल्ले रोखण्यासाठी हे फिचर मदत करणार आहे. परिणामी गुगल चॅट युजर त्यांच्यापुढे उदभवणाऱ्या धोक्यापूर्वीच सतर्क असतील. फोन हॅक होण्याचं प्रमाणही यामुळं कमी असणार आहे.