Gadgets News : आजकाल Google Pay आणि  PhonePe नाही असं म्हणणारा एकही व्यक्ती नाही. साधं 5 रुपयांचं पेमेंट सुद्धा आपण Google Payने करतो. आजकाल आपण रोजचे व्यवहार हे Google Pay किंवा PhonePe करतो. लोकांना Google Pay इतकी सवय झाली आहे की अगदी छोट्यातील छोटे व्यवहार हे यावरुन केले जातात. त्यामुळे अनेक वेळा आपल्याजवळ पर्समध्येही कॅश नसते. 
धावपळीच्या जगात आता आपल्याला कॅशलेस व्यवहाराची सवय लागली आहे. या ॲप्सद्वारे पेमेंट करताना आपल्याला खूप सावधगिरी बाळगायला पाहिजे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये ऑनलाइन पेमेंटच्या काळात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. तुमच्या एका चुकीमुळे तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2016 मध्ये UPI रिलीज झाला. त्यानंतर आता सध्या एकच व्यक्ती वेगवेगळ्या बँक खात्यांशी जोडलेलं UPI आयडी बनवू शकतात. जेव्हा तुम्ही Google Pay आणि PhonePe वर UPI आयडी तयार करता, तेव्हा अशावेळी तुम्ही वेगळे पत्ते देता. पण काही वेळा हा वेगळा पत्ता तुमच्यासाठी डोके दुखी ठरवू शकतो. कारण वेगवेगळे UPI आयडी हे लक्षात ठेवणे खूप कठीण असतं. चला तर मग आज आम्ही तुला असा सोपा मार्ग सांगणार आहोत, तो वापरुन तुम्ही वेगवेगळे UPI आयडी सहजपणे डिलीट करु शकता. 



PhonePe वर UPI आयडी कसा डिलीट करणार?


साधारण PhonePe वर UPI आयडी हा '971XXXX@ybl' या स्वरुपात तयार केला जातो. तर  Google Pay वर UPI आयडी हा तुमच्या नावानुसार म्हणजे  'JaisinXXX@okicici' असा जनरेट होतो. तर PhonePe वरील UPI आयडी डिलीट करण्याची तुम्ही पहिले हे अॅप ओपन करा. या अॅपच्या वरच्या डाव्या बाजूवरील Profile वर क्लिक करा. ज्या बँकेचं नाव तुम्हाला डिलीट करायचे आहे त्या खात्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला UPI आयडीतील सर्व UPI दिसतील. या UPI आयडीच्या उजव्या बाजूला तुम्हाला डिलीट बटण दिलेस. त्यावर क्लिक करुन तुम्ही UPI आयडी सहज डिलीट करु शकता.



Google Pay वर UPI आयडी कसा डिलीट करायचा?


Google Pay वर UPI आयडी डिलीट करणे खूप सोपे आहे. Google Pay अॅपवर गेल्यानंतर तुम्हाला वरच्या उजव्या बाजूला Profile दिसतं. त्यानंतर बँक खात्यावर जा. जे बँक खातं डिलीट करायचे आहे त्यावर क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला Manage UPI ID वर क्लिक करा. आता तुम्हाला सगळे UPI आयडी पाहिल्या मिळेल. या UPI आयडीच्या बाजूला डिलीट बटण दिसेल. जो UPI आयडी तुम्हाला नको आहे तो डिलीट करा. 


तसंच हे अॅप वापरताना अजून काही गोष्टींकडे लक्ष द्या. मोबाईल फोनच्या स्क्रीन लॉकप्रमाणे या अॅप्सलाही लॉक ठेवा. PIN कोणालाही शेअर करु नका. माहिती नसलेल्या लिंक्सवर क्लिक करु नका. तुमच्या अॅपला अपडेट करत राहा आणि एकापेक्षा जास्त अॅप्सचा वापर करणे टाळा. या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्यास तुम्ही अॅप्सच्या फसवणुकीपासून सुरक्षित राहाल.