गूगल फोटोच्या या नव्या फीचरमुळे वाचणार तुमचा डाटा
डाटा वाचवेल हे नवे फीचर
मुंबई : अॅन्ड्रॉईड युजर्ससाठी गुगल फोटोज हे वरदान आहे. कारण याचा वापर करून फोनची मेमरी न वापरता फोटो आणि व्हिडिओ सेव्ह करता येतात. आता ही सोय अधिकच उत्तम करण्यासाठी त्यामध्ये अपडेट करण्यात आले आहेत. नवं ३.४ अपडेटनुसार अधिक डाटा न वापरता तुम्ही व्हिडिओ रिप्ले करून पाहू शकाल.
कॅशे डाटा वापरूनच तुम्ही जुना व्हिडिओ पुन्हा पाहू शकणार आहात. यामुळे सहाजिकच डाटा वाचतो आणि ही प्रक्रिया गतिशील होते, असे ऑनलाईन रिव्हूमधून स्पष्ट झाले आहे. गुगल फोटोज ३.४ मध्येही व्हिडिओ अगदी झटपट सुरू होतात.
तुम्ही नव्या अपडेट्सचे फायदे पाहिले पण याचे काही तोटेही आहेत. तुम्ही पाहिलेल्या प्रत्येक व्हिडिओचा कॅशे तयार होतो आणि तो स्टोअरेजमध्ये राहतो. तुम्ही वेळोवेळी हे कॅशे क्लिअर करू शकता. नव्या अपडेटनुसार हे फीचर अॅटोमॅटिक असल्याने कोणत्याही व्हिडिओवर युजर्सचे नियंत्रण नाही. नव्या अपडेटमध्ये तुम्हांला कॅशे मॅनेज करायची सोयदेखील नाही. तुम्हांला हव्या असलेल्या व्हिडियोचे कॅशे तुम्ही निवडू शकत नाही. त्यामुळे एकतर तुम्हांला सारेच ठेवाववे लागतील किंवा सार्यांनाच काढून टाकावे लागेल.
गुगल प्ले स्टोअरमध्ये हे नवे अपडेट उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हांला गरज असेल तर आत्ताच ते अपडेट करून घ्या नक्की