Google Pixel 7 Vs iPhone 14: या दोन स्मार्टफोनमध्ये कोण वरचढ? जाणून घ्या
Google Pixel 7 आणि iPhone 14 मध्ये कोणता स्मार्टफोन चांगला आहे? या दोन स्मार्टफोनची खासियत जाणून घ्या जेणेकरून स्मार्टफोन निवडणं सोपं होईल.
Google Pixel 7 Vs iPhone 14: गुगलने नुकताचा आपल्या नवा कोरा Google Pixel 7 स्मार्टफोन लाँच केला आहे. यासोबत गुगलने Pixel Pro, Pixel वॉच आणि Pixel टॅबलेट लाँच केला आहे. मात्र काही दिवसांपूर्वी अॅपलनं लाँच केलेल्या iPhone 14 शी या फोनची तुलना केली जात आहे. त्यामुळे मोबाईलप्रेमींमध्ये संभ्रमावस्था आहे की, Google Pixel 7 आणि iPhone 14 मध्ये कोणता स्मार्टफोन चांगला आहे? या दोन स्मार्टफोनची खासियत जाणून घ्या जेणेकरून स्मार्टफोन निवडणं सोपं होईल.
चिपसेट: गुगलने नव्या पिक्सल 7 मध्ये टेन्सर G2 चिप दिली आहे. यामुळे हा फोन व्यवस्थितरित्या चालतो. लाईव्ह ट्रान्सलेट, गुगल असिस्टन्ट आणि वॉईस टायपिंग व्यवस्थितरित्या कार्य करतं. त्याचबरोबर पाच वर्षांचं सेक्युरिटी अपडेटची व्यवस्था आहे. दुसरीकडे आयफोन 14 मध्ये A15 बायोनिक चिपसेट आहे. हा चिपसेट आयफोन 13 मध्ये होता.
कॅमेरा: गुगल पिक्सल 7 मध्ये असलेल्या टेन्सर G2 चिपसेटमुळे कॅमेऱ्या परफॉर्मन्स वाढला आहे. यात ड्युअल कॅमेरा सेट अप आहे. प्राथमिक कॅमेरा 50 एमपीचा असून 12 एमपीसह अल्ट्रा वाइड सेन्सर आहे. त्याचबरोबर सिनेमॅटिक ब्लर व्हिडीओ मोड, फोटो अनब्लर, नाईट साईट असे नवे फीचर आहेत. दुसरीकडे आयफोन 14 मध्ये 12 एमपीचा कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये नाईट मोड, फोटोग्राफिक स्टाईल, पोर्ट्रेट मोड आणि सिनेमॅटिक मोडचा समावेश आहे.
डिस्प्ले: गुगल पिक्सल 7 मध्ये 6.32 इंचाचा OLED डिस्प्ले असून 90 एचझेड रिफ्रेश रेट, 6.1 XDR OLED डिस्प्लेसह 60 HZ रिफ्रेश रेट आहे. गुगल पिक्सल 7 मध्ये डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. आयफोन 14 या फिचरची उणीव दिसून येते. अॅपलने हे फिचर आयफोन 14 प्रो मॉडेलमध्ये दिलं आहे.
GPay करताना आताही मिळवू शकता Cashback! पेमेंट करताना या ट्रिक वापरून पाहा
बॅटरी लाईफ: गुगल पिक्सल 7 ची बॅटरी लाईफ 24 तासांपेक्षा जास्त काळ चालते, असा दावा कंपनी करते. दुसरीकडे आयफोन 14 ची बॅटरी 20 तासांपर्यंत चालते, असा दावा अॅपलने केला आहे.
किंमत: गुगलच्या पिक्सल 7 च्या स्मार्टफोनची किंमत 59,999 रुपये इतकी असून आयफोन 14 ची किंमत 79,900 रुपये इतकी आहे.