Fake Loan Apps: सध्या बाजारात नवीन फॅड आलंय. बँकेकडे न जाता ग्राहक थेट मोबाईल ऍप्सचा वापर करून सहज कर्ज काढू शकतात. मात्र यातील अनेक ऍप्स तुमची माहिती खरंच सुरक्षित ठेवतात का? RBI ने घालून दिलेल्या सर्व नियमांचं उल्लंघन करतात का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या लोन देणाऱ्या ऍप्सचा ट्रेंड वाढताना पाहायला मिळतोय. या ऍप्सच्या अनेक जाहिरातीही मोबाईलवर पाहायला मिळतात. मात्र गुगलने आता याच सहज कर्ज देणाऱ्या ऍप्सबाबत अलर्ट जारी केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे याच वर्षीच्या जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत गुगलने तब्बल 2000 लोन ऍप्स हटवले आहेत. माहिती चुकीच्या पद्धतीने सादर करणे, ऑफलाईन संदिग्ध व्यवहार, अटी आणि शर्थींचं उल्लंघन अशा गंभीर कारणामुळे गुगलने हे पाऊल उचलल्याचे समजतंय. 


युजर्सची सुरक्षा सर्वात महत्त्वाची 


कंपनीच्या उच्चपपदस्थ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार गुगल कायम ग्राहकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं जातंय. डिजिटल प्लॅटफॉर्मवरून ग्राहकांची होणारी फसवणूक रोखणं ही गुगलची प्राथमिकता राहिली आहे. ग्राहकांना होणार त्रास रोखण्यासाठी गुगल कंपनी कायम वेगवेगळी पावलं उचलत असते. गुगलने कर्जाच्या ऑफर्स देणाऱ्या तब्बल 2000 ऍप्सवर कारवाईचा बडगा उचलत हे ऍप्स हटवले आहेत. ग्राहकांना चुकीची माहिती देणं, पॉलिसी उल्लंघन, ग्राहकांशी चुकीची वर्तणूक या धरतीवर गुगलने ही कारवाई केली आहे. गुगल भारतीय सरकार आणि भारतातील इंडस्ट्रीजसोबत मिळून काम करतंय. अशात कंपनी ग्राहकांची सुरक्षा आणि गोपनीयतेचा सन्मान करते, असंही अधिकारी म्हणाले. 


google removed 2000 bogus loan apps in connection with fraid and dala security issues