नवी दिल्ली : गूगलने पुन्हा एकदा आपल्या प्ले स्टोरमधील 6 धोकादायक ऍप्स डिलीट केले आहेत. हे ऍप्स जवळपास 2 लाखहून अधिक यूजर्सने डाऊनलोड केले आहेत. जर यूजर्सकडे अजूनही हे 6 ऍप्स डाऊनलोड केलेले असतील तर त्यांना ते त्वरित अनइन्स्टॉल करण्याचं सांगण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायबर सिक्योरिटी फर्म  Pradeoच्या रिपोर्टनुसार, गूगल प्ले स्टोरने कन्विनियन्ट स्कॅनर 2 (convenient scanner 2), सेफ्टी ऍपलॉक (Safety Applock), पुश मेसेज- टेक्सटिंग अँड एसएमएस (Push Message- Texting and SMS), इमोजी वॉलपेपर (Emogy Wallpaper), सेप्रेट डॉक स्कॅनर (Seperate Doc Scanner) आणि फिंगरटिप गेमबॉक्स (Fingertip Gamebox) हे जोकर मालवेअर संक्रमित ऍप्स डिलीट केले आहेत.  


जोकर मालवेअर डिव्हाइसमध्ये आल्यानंतर यूजर्सला प्रीमियम सर्व्हिससाठी कोणत्याही माहितीशिवाय सब्सक्राईब करुन देतात. 2017 पासून गूगलने प्ले स्टोरवरुन असे 1700 ऍप्स हटवले आहेत, जे जोकर मालवेअर संक्रमित होते.


दरम्यान, भारत सरकारनेही 118 चीनी मोबाईल ऍप्सवर बंदी घातली. यात जगभरातील प्रसिद्ध गेमिंग ऍप PUBGचाही समावेश आहे. याआधी भारत सरकारने जवळपास 106 ऍप्सवर बंदी घातली आहे.