मुंबई : गुगलनं आपल्या सर्च इंजिनमधून एक महत्त्वाचं फिचर हटवलं आहे. हे फिचर इमेज ऑप्शनशी जोडलेलं होतं. गुगलनं हे पाऊल कॉपी राईटच्या मुद्द्यामुळे उचलल्याचं बोललं जात आहे. गुगल इमेजमध्ये आता कोणत्याही फोटोवर व्ह्यू इमेज हा ऑप्शन मिळणार नाही. या फिचरमुळे यूजरना फोटो ओरिजनल साईझमध्ये पाहता येत होता. एवढच नाही तर हा फोटो डाऊनलोड करणंही सोपं जात होतं. पण आता फोटोंना ओरिजनल साईझमध्ये डाऊनलोड करणं कठीण होणार आहे. गुगलनं या सगळ्या बदलांबाबत ट्विटरवरून माहिती दिली आहे.


गेटी इमेजसोबत झालेला करार मुख्य कारण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेटी इमेजसोबत गुगलनं केलेल्या करारामुळे व्ह्यू इमेजचा ऑप्शन हटवण्यात आल्याचं बोललं जात आहे. याचबरोबर गुगलवर असलेल्या गेटीच्या फोटोवरही कॉपी राईटची माहिती देणं बंधनकारक करण्यात आलं आहे.


परवानगी न घेता फोटो सहज डाऊनलोड होत असल्यामुळे अनेक फोटोग्राफर्सनी नाराजी व्यक्त केली होती. कॉपीराईट असूनही हे फोटो इमेज सेक्शनमधून अगदी सहज डाऊनलोड करता येत होते. गेटी इमेजनंही अशीच तक्रार केली होती. फोटोग्राफर्स आणि वेबसाईटनं गुगलच्या या बदलाचं स्वागत केलं आहे. तर सामान्य यूजर्स मात्र या बदलामुळे नाराज होऊ शकतात.