मुंबई: गुगलने गेल्या काही दिवसांमध्ये काही अॅप बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता गुगलकडून युझर्सला आणखी एक धक्का मिळणार आहे. याचं कारण म्हणजे अजून एक अॅप बंद होण्याच्या तयारीत आहे. Google असिस्सटेंट वापरण्यासाठी आता गुगल युझर्सना प्रेरणा देत आहे. द वर्ज यांच्या अहवालानुसार एंड्रॉइड 12 मध्ये आता ऑटो एपला गुगल बंद करणार आहे. त्यामुळे काही युझर्सची निराशाही झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युझर्सना आता  Google Assistant ऐवजी आता ड्राइविंग मोडचा उपयोग करावा लागणार आहे. यामध्ये गुगल मॅप आणि एन्ड्रॉइड ऑटो सक्षम कार्ड दोन्ही सोबत हे काम करेल असं गुगलकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे काही युझर्समध्ये नाराजीचं वातावरण आहे. 


जे लोक एन्ड्रॉइड ऑटो मोबाईल अॅपचा वापर करतात त्यांना गुगल ड्रइव्हिंग मोडवर शिफ्ट होणं आवश्यक आहे. त्यांना गुगल ऑटोमॅटिकली एन्ड्रॉईड 12 अपडेट केल्यावर तिथे शिफ्ट करेल. Google Assistant ड्राइविंग मोड बिल्ड इन मोबाइल ड्राइविंग अनुभव युझर्सना घेता येणार आहे. 


केवळ कार स्क्रीनसाठी हे एप उपलब्ध असणार
Google एपद्वारे युझर्सना याची माहिती देण्यात आली आहे. फोन स्क्रीनसाठी एन्ड्रॉइड ऑटो एपच्या युझर्सना गुगलकडून एक सूचना येईल आणि त्यानंतर हा बदल होईल. सध्या हा बदल केवळ कार स्क्रीनसाठी उपलब्ध आहे. तर हा बदल गुगल असिस्टंटचं रुप बदलून ड्राइव्ह मोडला जाण्यासाठी दिलेला इशारा आहे. 


गुगलने 2019 मध्ये गुगल असिस्टंटसाठी ड्राइव्ह इन मोडची घोषणा केली होती. तर ही सुविधा गेल्यावर्षीपासून युझर्ससाठी सुरू झाली आहे. तर गुगल असिस्टंट बंद होण्याच्या तयारीत असल्याने युझर्सनी ड्राइव्ह इन मोड वापरावा असा गुगलकडून सांगण्यात आलं आहे.