Google Search : गुगल... हल्लीच्या काळात खऱ्या अर्थानं आपला मित्र आहे असंच म्हणावं लागेल. कारण, या गुगलची हुशारी इतकी की त्याच्याकडे जगातल्या कठीणातील कठीण प्रश्नाचंही उत्तर आहे. फक्त तुमच्या प्रश्चांची उत्तरच देत नव्हे, तर गुगल त्याची हुशारी दाखवतही युजर्सना थक्क करत असतो. तुम्ही त्याची परीक्षा घेऊन पाहिलीये का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Google सर्चमध्ये गमतीला भाग म्हणून काही नवे शब्द सर्च करून पाहा. यानंतर सर्च बटणावर क्लिक केलं असता तुमच्यासमोर येणारा Search Result अनपेक्षित आणि अवाक् करणारा असेल यात शंका नाही. 


Google वर Search करा 'हे' शब्द... 


Drop Bear : हा शब्द सर्च करताच तुम्हाला स्क्रीनवर रस्त्याच्या आकाराचं एक चिन्हं दिसेल. या चिन्हावर क्लिक केलं असता तुम्हाला एक लहानसं अस्वल स्क्रीनच्या वरच्या भागातून खाली पडताना दिसेल. 


Chicxulub Crater : टाईप करून सर्च केलं असता तुमच्या वेबपेजवर क्रेटर पडताना दिसेल. बरं, यानंतर आश्चर्यकारकरित्या तुमची स्क्रीनही काहीशी हलताना दिसेल. 


Dart Mission : डार्ट मिशन हा शब्द सर्त केला असता स्क्रीनवर एक अवकाशयान तुम्हाला दिसेल. इथं तुमची नजर थांबत नाही तोच स्क्रीनवर एक स्फोट होऊन ते अवकाशयान तिरपं होताना दिसेल. 


Last Of Us : हे एका सीरिजचं नाव आहे. पण, गुगलवर हे सर्च केलं असता मशरुमच्या आकाराचं एक चिन्हं तुम्हाला दिसेल. ज्यावर वारंवार क्लिक केल्यानंतर तुमच्या संपूर्ण स्क्रीनवर मुळं दिसतील. 


Do Barrel Roll : असं गुगल सर्च केलं असता पूर्ण वेबपेज गुंडाळलं जाईल. कमाल आहे ना? 


हेसुद्धा वाचा : Indian Railways कडून प्रवाशांसाठी 'विकल्प'; तिकीट बुकींगदरम्यान फायद्याची हमी 


Joey Tribbbiani : असं गुगलच्या सर्चबॉक्समध्ये टाईप करून सर्च बटणावर क्लिक केल्यास तुम्हाला उजव्या कोपऱ्यामध्ये पिझ्झाचं एक चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक केलं असता Joseph Francies Tribbbiani Jr चा आवाज येऊन अनेक खाण्याचे पदार्थ स्क्रीनवर दिसतील. 


Ross Geller : असं लिहून सर्च करताच स्क्रीनवर एक सोफा दिसेल. ज्यावर क्लिक करताच तुमच्यासमोर रॉस गेलेर या पात्राचा आवाजही येईल. 


Buffy : हा शब्द गुगलवर सर्च केल्यास तुम्हाला एक गिटार स्पष्टपणे दिसेल. ज्यावर क्लिक केलं असता चक्क एक मांजर स्क्रीनवर चालू लागेल आणि एक गाणंही सुरु होईल.