Google Security Alert : जर तुमच्याकडेही अँड्रॉइड असेल आणि तुम्ही प्ले स्टोअरवरुन काही ॲप्स डाऊललोड केले असतील तर तुम्हाला खूप काळजी घेण्याची गरज आहे. कारण गुगलने प्ले स्टोअरवरून 17 मोबाईल ॲप्स डिलीट केले आहेत. या सर्व मोबाईल ॲप्समध्ये मालवेअर आढळून आले जे युजर्सची हेरगिरी करत होते. तसेच या अ‍ॅप्सवर गुगल प्ले डेव्हलपर पॉलिसीचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युजर्सच्या सुरक्षेसाठी गुगल नेहमीच पाऊले उचलतं असतं. गुगलने नुकतेच 17 स्पाय लोन ॲप्स डिलीट केले आहेत. लाखो लोकांनी हे ॲप्स प्ले स्टोअरवरून डाऊनलोडही केले होते. एका सॉफ्टवेअर कंपनी यासंदर्भात एक नवीन अहवालही जारी केला होता. त्यानुसार हे 17 ॲप्स  'स्पायलोन' ॲप्स म्हणून काम करत होते अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर हे ॲप्स गुगल प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले आहेत. 


SpyLoan हा मालवेअरचा एक प्रकार आहे जो या 17 ॲप्समध्ये होता. हे कोणत्याही युजर्सची हेरगिरी करू शकतात. याद्वारे युजर्सच्या फोनमध्ये असलेली सर्व प्रकारची माहिती हॅकर्सना उपलब्ध करून दिली जाऊ शकते. याच्या मदतीने तुमचे मेसेज देखील वाचू शकतात. हा मालवेअर युजर्सना ब्लॅकमेलही केले जाऊ शकतो. भारत, अमेरिका, आफ्रिका यांसारख्या देशांतील युजर्सचा SpyLoan मुळे मोठा फटका बसतो. त्यामुळे गुगलने यापैकी 17 ॲप हटवले आहेत.


हे ॲप्स कोणतीही माहिती न देता यूजर्सचा डेटा चोरत होते. त्यामुळे जर तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप्स असतील तर ते पटकन डिलीट करा. काही प्रकरणांमध्ये कर्ज घेणाऱ्या लोकांना ब्लॅकमेल करण्यासाठी या ॲप्सचा वापर करण्यात आला. या डेटाच्या आधारे ते युजरला कर्जाची परतफेड करण्यास भाग पाडायचे आणि जास्त व्याजाची मागणीही करायचे.


ही आहेत SpyLoan मालवेअर असलेल्या ॲप्सची नावे


AA Kredit
Amor Cash
GuayabaCash
EasyCredit
Cashwow
CrediBus
FlashLoan
PréstamosCrédito
Préstamos De Crédito-YumiCash
Go Crédito
Instantáneo Préstamo
Cartera grande
Rápido Crédito
Finupp Lending
4S Cash
TrueNaira
EasyCash