मुंबई : स्मार्टफोन आणि कार आपल्यासाठी खूपच महत्वाची गोष्ट असते. सध्या स्मार्टफोन आणि कारांची चोरी करण्याचे प्रमाण वाढले आहे. टेक कंपनी गुगल लवकरच नवीन फिचर आणत आहे. गुगलने आपल्या 'फाइंड माय डिवाइस' इकोसिस्टिममध्ये नवीन फीचर जोडण्यासाठी मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

9 to 5 Google च्या रिपोर्टनुसार गुगल अशाच फीचरवर काम करीत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.  ज्याअंतर्गत Android फोनचा वापर करून हरवलेल्या Android फोनला ट्रॅक करता येईल. ज्या कार नवीन Android ऑटो इन्फोटेनमेंट सिस्टिमसोबत येतात. त्यांची चोरी झाल्यानंतरही ट्रॅक करण्यात मदत करेल.


बिना इंटरनेटचे फोन आणि कारची केली जाईल ट्रॅ्किंग


9to5 Google च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, फाइंड माय डिवाइस फीचर अंतर्गत असे फीचर सामिल करण्यात येणार आहे की, तुमच्या स्मार्टफोनची ओनरशिप तुम्ही शेअर करू शकता. या फीचरनुसार तुम्ही हरवलेला फोन ट्रॅक करू शकाल. हरवलेल्या फोनचे इंटरनेट कनेक्शन बंद असले तरी फोन ट्रॅक करता येईल.


 ऍन्ड्राइड ऑटो इंफोटेनमेंट सिस्टिमवर तुम्हाला गुगल अकाउंटवरून लॉग इन करण्याची सुविधा सुरू होणार आहे. यामाध्यमातून तुम्ही हरवलेल्या गोष्टी ट्रॅ्क करू शकाल. एवढेच नाही तर गुगल अकाउंटच्या अनऑथोराइज्ड एक्सेसला सुद्धा थांबवेल. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, गुगल या सुविधांवर काम करीत आहे. या सुविधा नक्की केव्हा जारी करण्यात येतील याबाबत अद्याप माहिती उपलब्ध नाही.