Google Street View App Shutting: तंत्रज्ञानाच्या युगात सर्व काही एका क्लिकवर उपलब्ध होतं. गाडी बूक करण्यापासून योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठी सर्व काही सोपं झालं आहे. इतकंच काय एकदा लोकेशन सेट केलं की, कोणाला रस्ता विचारण्याची आवश्यकताही भासत नाही. गुगल एका सर्च इंजिनसारखं काम करते. गुगलमुळे अनेक सुविधा सुखकर झाल्या आहेत. या कंपनीचे अनेक अ‍ॅप्स आहेत. या अ‍ॅपच्या माध्यमातून रस्ता शोधणं सोपं होतं. मात्र गुगल आपलं एक अ‍ॅप बंद करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे भविष्यात या अ‍ॅपचा वापर करता येणार नाही. ही बातमी गुगल मॅप्सबद्दल (Google Maps) नाही, तर गुगल स्ट्रीट व्ह्यू अ‍ॅपबद्दल आहे. गुगलचं स्टँडअलोन स्ट्रीट व्ह्यू अ‍ॅप (Google Street View App) आहे. हे अ‍ॅपल येत्या काही दिवसात प्ले स्टोअरवरून काढलं जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगगल स्ट्रीट व्ह्यू अ‍ॅपच्या माध्यानून लोकेशन 3 डी आणि 360 डिग्रीमध्ये मिळते. लोकेशनवर जाण्यापूर्वीच आपल्याला या माध्यमातून माहिती मिळते. गुगल स्ट्रीट व्ह्यू अ‍ॅपमधील सर्व फीचर्स आता गुगल मॅपमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे गुगल मॅप्स अ‍ॅप असताना या अ‍ॅपची गरज भासणार नाही. त्यामुळे गुगल स्ट्रीट व्ह्यू अ‍ॅप बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


अरे देवा हे काय केलंस! Scorpio-N चा लूक आनंद महिंद्र आश्चर्यचकीत, ट्वीट करत म्हणाले...


गुगल स्ट्रीट व्ह्यू अ‍ॅप आयफोन आणि अँड्राईड युजर्ससाठी मार्च 2023 पर्यंत बंद केलं जाईल. गुगल स्ट्रीट व्ह्यू अ‍ॅप फीचर देशातील फक्त 10 शहरात उपलब्ध होतं. यात दिल्ली, मुंबई, पुणे, नाशिक, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद, बडोदा आणि अमृतसर या शहरांचा समावेश आहे.