मुंबई : आपल्यापैकी प्रत्येक जण हे आपल्याला काहीही जाणून घ्यायचं असेल की, गुगल सर्च करतो. येथे आपल्याला जवळ-जवळ सर्वच प्रश्नांची उत्तर मिळतात. ज्युमुळे गुगलला ज्ञानाचा भंडार देखील म्हणतात. म्हणूनच भारतच नाही तर संपूर्ण देशात गुगुल फारच प्रसिद्ध आहे. गुगल आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अॅप आणि फीचर्स प्रोवाईड करतो. त्यांपैकी एक आहे गुगल ट्रांसलेटर.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगल ट्रांसलेटर आपल्याला कोणत्याही भाषा आपल्याला भाषेत ट्रांसलेट करायला मदत करतो. ज्यामुळे समोरच्याला काय म्हणायचंय किंवा काय लिहिलेय ते लक्षात येते.


परंतु कितीही झालं तरी टेक्नोलॉजिच ती, त्याला भावना कळत नाही. ते फक्त शब्दांना जशाच तशे ट्रांसलेट करतात. ज्यामुळे बऱ्याचदा शब्दांचा अर्थच बदलून जातो.


तुम्ही देखील कधी ट्रांसलेटरचा वापर केला असेल, तर तुमच्या लक्षात येईल की, शब्द कसे बदलले जातात.


त्यात गुगलने एक वाक्य असं काही ट्रांसलेट केलंय, की ते पाहून तुम्हाला तुमचं हसु आवरणार नाही


आपण दारुला विरोध करणारे अनेक स्लोगन एकले असतील, ज्यांपैकी सर्वात प्रसिद्ध आहे ते म्हणजे, 'से नो टू एल्कोहोल'. परंतु या वाक्याला गुगल ट्रांसलेटरने असं काही ट्रांसलेट केलंय की, त्याचा संपूर्ण अर्थच बदलून गेला आहे.


गुगलने 'से नो टू एल्कोहोलला', हिंदीमध्ये ट्रांसलेट करुन म्हटलंय की, 'शराब को कुछ मत कहना'. जे फारच मनोरंजक आहे.



हा ट्रांसलेट केल्याचा फोटो जेव्हा एका व्यक्तीने सोशल मीडियावर शेअर केलं तेव्हा त्यावर लोकांनी भरभरुन कमेंट केल्या आहेत.