Google Account Delete: प्रश्न कोणताही असो, त्या प्रश्नाचं उत्तर मिळणारं एकमेव ठिकाण म्हणजे गुगल. 'Google को सब पता है', असं अनेकजण निर्धास्तपणे म्हणतात आणि मनाला वाटेल तो प्रश्न इथं येऊन विचारतात. गुगलच्याच माध्यमातून Gmail च्या मदतीनंही अनेक कामं सुकर होतात. बँक खातं, एखादी सरकारी योजना, नोकरीच्या ठिकाणी दिली जाणारी माहिती अशा एक ना अनेक कारणांसाठी या जीमेलची मदत होते. पण, आता हेच जीमेल अकाऊंट Google डिसीट करायला निघालं आहे. डिसेंबर महिन्यापासून गुगलकडून त्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असून, यामधत्ये तुमचंही अकाऊंट असू शकतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चांगल्याच चांगलं Online Environment तयार करण्यासाठी गुगलकडून हे अकाऊंट डिलीट केले जाणार आहेत. कंपनीकडूनच देण्यात आलेल्या माहितीनुसार जे अकाऊंट सातत्यानं वापरात नाहीत, असे सर्व अकाऊंट डिलीट केले जातील. हल्लीच याबाबतची सविस्तर माहितची गुगलक़डून देण्यात आली आहे. 


यामध्ये तुमचंही अकाऊंट असेल का? 


बऱ्याच काळापासून तुम्ही जर जीमेल अकाऊंट Active च केलं नसेल, तर गुगलच्या या कारवाईचा फटका तुम्हाला बसू शकतो. कारण, Better Security च्या कारणास्तव आता गुगल असे सर्व सक्रिय नसणारे अकाऊंट बंद करणार आहे. या जुने किंवा सक्रिय नसणारे जीमेल अकाऊंट सायबर क्राईमअंतर्गत धोक्याचे असतात. हाच धोका टाळण्यासाठी गुगल ही कारवाई करत आहे. 


हेसुद्धा वाचा : रंग, मॉडेल, फिचर्समध्ये साम्य असूनही Mahindra च्या कार TATA मोटर्सवर मात का करु शकत नाहीत?


 


Google च्या निकषांनुसार मागील दोन वर्षांपासून जर एखादं जीमेल अकांऊंट वापरात आणलं नसेल, त्यात साईन अप करण्यातच आलं नसेल, तर ते Delete करण्यात येईल. त्यामध्ये असणारी सर्व माहिती, त्याच्याशी संलग्न सर्व माहितीसुद्धा या कारवाईनंतर डिलीट केली जाईल. ज्यामध्ये वर्क प्लेस डेटा, जीमेल डॉक्स, ड्राईव्ह, मीट, कॅलेंडर, फोटो हे सर्व डिलीट होईल. 


गुगलकडून ही कारवाई होण्याआधी तुम्हाला रितसर नोटिफिकेशन येणार आहे, ज्यामध्ये Notification Mail आणि Recovery Email सुद्धा असेल. हॅकर्सकडून सक्रिय नसणाऱ्या गुगल अकाऊंटवर निशाणा साधला जातो, ज्यामध्ये जुन्या किंवा रियूज्ड पासवर्डचा वापर केला जातो. शिवाय या अकाऊंट्समध्ये टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि इतर सुरक्षेच्या निकषांचं पालनही करण्यात आलेलं नसतं. त्यामुळंच गुगल इतर युजर्सची सुरक्षितता लक्षात घेता हे अकाऊंट डिलीट करणार आहे.