मुंबई : गुगलच्या पिक्सल 2 मोबाईलमध्ये कॉलिंगच्या वेळी येणाऱ्या प्रतिध्वनीची समस्या लवकरच सोडवण्यात येणार आहे. आगामी दिवसांमध्ये कंपनी मोबाईलचं सॉफ्टवेअर अपडेट करणार असून ही समस्या दुरुस्त होईल, असं आश्वासन कंपनीनं दिलं आहे. पिक्सल 2 हा मोबाईल असणाऱ्या काही ग्राहकांनी कंपनीला या समस्येबाबत सांगितलं होतं. त्यानंतर कंपनीनं काही ग्राहकांना मोबाईल बदलूनही दिला होता. पण नव्या हँडसेटमध्येही अशाच प्रकारची समस्या होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगलचा पिक्सल 2 हा स्मार्टफोन या महिन्याच्या सुरुवातीला भारतीय बाजारात उपलब्ध झाला. 4GB रॅम आणि 64GB इंटरनल मेमरी असलेल्या या स्मार्टफोनची किंमत ६१ हजार रुपये आहे. तर 4GB रॅम आणि 128GB इंटरनल मेमरी असलेल्या स्मार्टफोनची किंमत ७० हजार रुपये आहे.


पिक्सल 2 अॅण्ड्रॉईड 8 ओरिओ ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. फोनची स्क्रीन फुल एचडी (1920x1080) एमोलेड आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 835 ऑक्टा-कोअर प्रोसेसरबरोबर 2700 एमएएचची बॅटरी आहे.