Gem Online Marketplace: गेल्या काही वर्षात ऑनलाइन शॉपिंगचे (online shopping) प्रमाण वाढले आहे. लोक स्वतः बाजारात जाऊन कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी (product shopping) करण्याऐवजी थेट स्मार्टफोनच्या (smartphone) एका क्लिकवर थेट घरीच वस्तू मागवत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑनलाइन शॉपिंगचे सर्वात मोठे कारण म्हणजे स्वस्तात मिळणाऱ्या वस्तू. प्रमुख ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म्स पैकी एक असलेल्या Amazon आणि Flipkart वर अनेक वस्तूंवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळतो. बँक ऑफर, एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळाल्यास बाजाराच्या तुलनेत या प्लॅटफॉर्म्सवर वस्तू खूपच स्वस्तात मिळतात.


त्यामुळे ग्राहक या प्लॅटफॉर्म्सवरून खरेदी करण्याला प्राधान्य देतात. मात्र, या व्यतिरिक्त अशी एक सरकारी वेबसाइट आहे, जेथे Amazon आणि Flipkart पेक्षा स्वस्तात वस्तू मिळत आहे. अनेकांना या साइटबद्दल माहिती देखील नाही. आज आम्ही तुम्हाला या वेबसाइटबद्दल सांगणार आहोत.    


ही कोणती वेबसाइट आहे


खरंतर आम्ही तुम्हाला ज्या वेबसाइटबद्दल सांगणार आहोत तिचे नाव जेम (Gem) आहे. आणि ती एक सरकारी (government) बाजारपेठ आहे. येथे ग्राहक परवडणाऱ्या किमतीत उत्पादने खरेदी करू शकतात. विशेष म्हणजे या बाजारपेठेत उत्पादनाच्या गुणवत्तेचीही काळजी घेतली जाते. या बाजारपेठेबद्दल अजून फार लोकांना माहिती नाही. तथापि, फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनपेक्षा कमी किमतीत या बाजारात वस्तू उपलब्ध आहेत.


वस्तू किती स्वस्त आहे?


जर तुमच्या मनात प्रश्न असेल की या वेबसाइटवर (website) किती स्वस्त वस्तू दिल्या जात आहेत. तर आम्ही तुम्हाला सांगतो की, 2021-22 मध्ये झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात अशी 10 उत्पादने असल्याचे समोर आले आहे. जेम (gem) वर खूप किफायतशीर आहेत. या सर्वेक्षणात एकूण 22 उत्पादनांमध्ये तुलना करण्यात आली होती.


ज्यात जेमवरील उत्पादने तसेच इतर ई-कॉमर्स साइट्सवरील उत्पादनांचा समावेश होता आणि या 10 उत्पादनांमध्ये इतर साइट्सच्या तुलनेत 9.5 टक्के स्वस्त असल्याचे आढळले होते. होते. उदाहरणार्थ, जर तुम्ही इतर साइट्सवर नजर टाकली तर, 100 रुपयांचे उत्पादन जेमवर फक्त 90 रुपयांच्या आसपास मिळत आहे.