पूनम नार्वेकर, झी मीडिया, मुंबई : हेरगिरीमुळे कायम संशयाच्य़ा भोवऱ्यात राहिलेल्या व्हॉट्सऍपकडून भारताची कायम अडवणूक केली जाते. याच व्हॉट्सऍपचे दिवस आता भरलेत. व्हॉट्सऍपला पर्याय म्हणून सरकारनं स्वतःचं जिम्स नावाचं मॅसेजिंग ऍप आणलंय. त्यामुळं व्हॉट्सऍपची मक्तेदारी मोडीत निघालीय. भारतात व्हॉट्सऍपचे कोट्य़वधी वापरकर्ते आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेगवान मॅसेजिंग सिस्टिम असल्यानं व्हॉट्सऍपचा सरकारी पातळीवरही वापर होतो. पण व्हॉट्सऍपचा वापर सुरक्षित नसल्याचं अधोरेखित झालं आहे. यावर पर्याय म्हणून सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामासाठी जिम्स ऍप देण्यात येणार आहे. 


सध्या ओडिशातील सरकारी कर्मचारी हे ऍप प्रायोगिक तत्वावर वापरत आहेत. शिवाय भारतीय नौदलाकडूनही य़ाचा वापर होत असल्याचं सांगण्यात येतंय. व्हॉट्सऍपला सुरक्षित पर्याय म्हणून याकडं पाहिलं जातंय.


जिम्स ऍपच्या धर्तीवर भारतानं स्वतःची ई-मेल यंत्रणाही तयार केली पाहिजे असं सायबर तज्ज्ञांना वाटतं.


जिम्सचा वापर सरकारी कार्यालयात यशस्वी झाला तर तो सामान्यांसाठीही वापरण्यासाठी खुला केला पाहिजे. असं झाल्यास व्हॉट्सऍपची मक्तेदारी मोडीत निघेल. शिवाय मॅसेजिंग ऍपमुळे भारतात हेरगिरीसारखे प्रकारही होणार नाहीत.