मुंबई : भारतात असे अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत जे स्वस्त वस्तू विकत आहेत. ज्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु बर्‍याच वेळा लोकांना त्यांच्या गुणवत्तेबद्दल शंका असते. लोकांचा फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन सारख्या साईटवर अधिक विश्वास आहे. कारण ते दोघेही अनेक वर्षांपासून त्यांची सेवा देत आहेत आणि लोकांचा त्यांच्यावर खूप विश्वास आहे. या दोन्ही ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर, तुम्हाला परवडणाऱ्या किमतीत योग्य वस्तू मिळतात. तुम्हाला असे वाटत असेल की या दोन वेबसाइट स्वस्त वस्तू देत आहेत, तर असा विचार करणे चुकीचे आहे कारण या दोन्ही वेबसाइटपेक्षा आणखी एक सरकारी वेबसाइट आहे जी स्वस्त वस्तू विकत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे या वेबसाईटबद्दल फारशा लोकांना माहिती नाही, इतकेच नव्हे तर अनेकांनी हे नाव पहिल्यांदाच ऐकले आहे. जर तुम्हाला या वेबसाईटबद्दल काही माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.


GEM (Government e-Marketplace)


2021 ते 2022 दरम्यान झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, अशी 10 उत्पादने आहेत जी Gem नावाच्या (Government e-Marketplace) सरकारी वेबसाईटवर इतर कोणत्याही ईकॉमर्स साइट्सपेक्षा स्वस्त विकली जात आहेत. हे अद्याप लोकांच्या नजरेत आले नव्हते.


ही एक सरकारी वेबसाईट आहे. तुम्हाला येथे स्वस्त वस्तू मिळू शकतात. लोकं क्वचितच सरकारी वेबसाइटला भेट देतात पण या वेबसाइटचा तुम्हाला खूप उपयोग होऊ शकतो. जर तुम्हाला अद्याप याबद्दल माहिती नसेल, तर तुम्ही या वेबसाइटला नक्की भेट देऊ शकता आणि येथून वस्तू खरेदी करु शकता.


वेबसाईटची लिंक https://gem.gov.in/