फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटसअप होणार ब्लॉक?
या अॅप्सना `इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी नियम ६९ ए` अंतर्गत ब्लॉक केलं जाऊ शकतं
नवी दिल्ली : सोशल मीडियाला आळा घालण्यासाठी दूरसंचार विभाग सरसावलंय. डीओटीनं गरज पडल्यास सोशल मीडिया अॅप्स ब्लॉक करण्याची शिफारस करत कंपन्यांकडून त्यांची मतं मागवलीत. १८ जुलै रोजी लिहिलेल्या एका पत्रात दूरसंचार विभागानं इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉटअप, टेलिग्राम यांसारख्या मोबाईल अॅप्सला इंटरनेटवर कसं ब्लॉक करता येईल... याबद्दल संभाविक पर्याय देण्याची मागणी केलीय. सोशल मीडियातून फेक न्यूज रोखण्यासाठी आणि मॉब लिंचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं दूरसंचार विभागाचं म्हणणं आहे.
हे पत्र भारती एअरटेल, रिलायन्स जिओ, व्होडाफोन इंडिया, आयडिया सेल्युलर यांशिवाय टेलिकॉम आणि आयएसपी इंडस्ट्रीशी निगडीत इतर संस्थांना पाठवण्यात आलंय. या अॅप्सना 'इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी नियम ६९ ए' अंतर्गत ब्लॉक केलं जाऊ शकतं.
गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियाद्वारे फेक न्यूज जाणून बुजून पसरवलं जातं असल्याचं निदर्शनास येतंय. त्यामुळे देशात अनेक ठिकाणी मॉब लिंचिंगच्या घटनांतही वाढ झालेली दिसून आली. या घटना समोर आल्यानंतर सरकारनं व्हॉटसअपला नोटीस धाडलं होतं. सरकारच्या हस्तक्षेपानंतर व्हॉटसअपनं आपल्या सेटिंगमध्ये काही बदल केले ज्यामुळे फॉर्वर्डेड मॅसेज रेग्युलेट केले जाऊ शकतातद.