नवी दिल्ली : जीएसटी लागू झाल्यानंतर काही ऑटोमोबाईल कंपन्यांनी त्यांच्या गाड्यांची किंमत जाहीर केली आहे. होंडाने देखील त्यांच्या गाड्यांच्या किंमतीमध्ये बदल केला आहे. होंडा त्यांच्या काही गाड्यांच्या किंमती कमी केल्या आहे. ज्यामध्ये ७ हजारांपासून के 1 लाख रुपये पर्यंतचा फायदा होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होंडाने ब्रिओची किंमत 7980 ते 12279 रुपयांपर्यंत कमी केले आहे. अमेझच्या किंमतीत 9203 ते 14.825 रुपयांपर्यंत किंमत कमी केली आहे. जॅझच्या किंमतीत 6.168 ते 10.031 रुपयांपर्यंत किंमत कमी केली आहे.


होंडा-सीआर-व्ही या गाडीवर ग्राहकांना 7132 ते 10.064 रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. होंडा सिटीच्या किंमतीवर 16.510 रुपये ते 28.005 रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. बीआर व्ही मॉडेलवर 19.787 ते 30.387 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.